SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘वोडाफोन-आयडिया’चा पाय आणखी खोलात..! ‘या’ कारणामुळे ग्राहकांनीही सोडली साथ..!

टेलिकाॅम क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे, वोडाफोन-आयडिया…अर्थात ‘व्हीआय’ (VI).. रिलायन्स जिओने टेलिकाॅम क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून अनेक दिग्गज कंपन्या अडचणीत आल्या. त्यात वोडाफोन व आयडियाचे मोठे नुकसान झाल्याने दोन्ही कंपन्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही त्यांच्यामागील शुल्क काष्ठ काही संपले नाही..

एका अहवालानुसार, भारतात जवळपास 118 कोटी लोक मोबाईल, तर जवळपास 76 कोटी लोक ब्रॉड बॅन्ड वापरतात. ‘वोडाफोन-आयडिया’चे जवळपास 25 कोटी ग्राहक आहेत. मात्र, 2020 च्या तुलनेत कंपनीच्या वापरकर्त्यांमध्ये जवळपास 10 टक्क्यांनी घट झालीय.

Advertisement

वोडाफोन-आयडिया कंपनी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यात आणखी एक नवे संकट कंपनीसमोर उभे ठाकले आहे. संकट काळात ग्राहकांनीही कंपनीकडे पाठ फिरवलीय. अनेक जण वोडाफोन-आयडियाला ‘बाय’ ‘बाय’ करीत असल्याचे दिसते..

महिन्यात 19 लाख ग्राहकांचा टाटा
एका आकडेवारीनुसार, नोव्हेंबर-2021 मध्ये कंपनीला जवळपास 19 लाख ग्राहकांनी टाटा केले आहे. मागील 5 महिन्यांच्या तुलनेत कंपनीसाठी हा सर्वात मोठा झटका आहे. विशेष म्हणजे, त्यातील 12 लाख ग्राहक ग्रामीण भागातील असल्याचे समोर आले आहे..

Advertisement

कंपनीच्या सक्रिय ग्राहकांमध्ये सलग 36 महिने घट झाल्याचे दिसत आहे. मागील वर्षभरात वोडाफोन-आयडियासोबत (Vodafone-Idea) केवळ 14 लाख नवे 4G ग्राहक जोडले गेले. त्या तुलनेत ‘एअरटेल'(Airtel)सोबत 3.4 कोटी, तर ‘जिओ'(Jio)सोबत 2 कोटी नवे ग्राहक जोडले गेले. खराब नेटवर्कमुळेच ग्राहक कंपनीची साथ सोडत असल्याचे सांगण्यात येते.

नोव्हेंबर-2021 मध्ये ‘वोडाफोन-आयडिया’चे ग्राहक कमी होत असताना, ‘एअरटेल’ने जवळपास 13 लाख, तर ‘जिओ’ने तब्बल 20 लाख नवे ग्राहक जोडले आहेत. विशेष म्हणजे, त्यात ‘वोडाफोन-आयडिया’च्याच अनेक ग्राहकांनी ‘एअरटेल’ व ‘जिओ’ला जवळ केल्याचे दिसत आहे.

Advertisement

शेअर बाजारातही वोडाफोन-आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मोठे चढउतार राहिले. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर 13 टक्क्यांनी घटलेत. सध्या या कंपनीत सरकारची सर्वाधिक 35.8 टक्के भागिदारी आहे, तर ‘व्होडाफोन पीएलसी’कडे 28.5 टक्के आणि आदित्य बिर्ला ग्रुपकडे 17.8 टक्के भागिदारी आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement