SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी..! आता ‘या’ दिवशी मिळणार पेन्शन, नियमात मोठा बदल..

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना.. अर्थात ‘ईपीएफओ’ने (EPFO) पेन्शनच्या नियमांत महत्वाचा बदल केला आहे. तो म्हणजे, यापुढे पेन्शनधारकांना आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी वाट पाहावी लागणार नाही. महिन्याच्या शेवटच्या दिवशीच पेन्शनधारकांच्या खात्यात त्यांची पेन्शन जमा केली जाणार आहे.

‘ईपीएफओ’ने याबाबत नुकतेच तसे परिपत्रक काढले असून, त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘आरबीआय’च्या सूचनेनुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालये, बँकांना आता दर महिन्याच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी लागणार आहे..

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Spreadit (@spreadit_india)

Advertisement

पेन्शनधारकांकडून तक्रारी
दर महिन्याचा कामकाजाच्या पहिल्या दिवशी किंवा जास्तीत जास्त 5 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पेन्शन जमा केली जात होती. मात्र, बऱ्याचदा त्यात उशीर होत होता. वेळेवर पेन्शन मिळत नसल्याने फक्त त्यावरच अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होत असत..

याबाबत पेन्शनधारकांनी ‘ईपीएफओ’कडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत ‘ईपीएफओ’ने महिन्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर त्यांची पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत 13 जानेवारी 2022 रोजी परिपत्रक काढून या बदलाची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

वेळेवर पेन्शन मिळणार असल्याने देशातील असंख्य पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना या बदललेल्या नियमाचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येते.

मार्च महिन्याचा अपवाद
आता प्रत्येक महिन्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी पेन्शनधारकांच्या खात्यात पेन्शन जमा होईल. त्यासाठी फिल्ड ऑफिसर्स (Field Officers) सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कागदपत्रे बँकांना पाठवतील, असे निर्देश ‘ईपीएफओ’ने दिले आहेत.

Advertisement

दरम्यान, या नियमात मार्च महिन्याचा अपवाद असेल.. मार्च हा आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना असल्याने मार्चअखेर पेन्शन जमा होणार नाही, तर ती 1 एप्रिल किंवा त्यानंतर जमा होणार असल्याचे ‘ईपीएफओ’ने आपल्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement