कोणतेही सरकारी काम करायचे असो, एका कागदपत्राची सतत मागणी केली जाते, ते म्हणजे आधारकार्ड.. प्रत्येक नागरिकासाठी आता ‘आधार’ अनिवार्य करण्यात आले आहे. विविध कामासाठी त्याचा वापर केला जातो. मात्र, या आधारकार्डबाबत युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)तर्फे नुकतीच महत्त्वाची माहिती देण्यात आलीय.
गेल्या काही दिवसांपासून बाजारातून आधारकार्ड तयार करुन दिले जात होते. ‘स्मार्ट आधारकार्ड’ असे गोंडस नाव त्याला दिले होते. मात्र, आता बाजारात असे वेगवेगळ्या प्रकारात बनविले जाणारे ‘स्मार्ट आधार कार्ड’ ग्राह्य धरले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण ‘यूआडीएआय’ यांनी दिले आहे.
#OrderAadhaarPVC#Aadhaar PVC card is more durable and convenient to carry, and it is just as valid as Aadhaar Letter and #eAadhaar.
To order your Aadhaar PVC online, click https://t.co/G06YuJBrp1#OrderAadhaarOnline#OrderPVC pic.twitter.com/PN6IyvObyK— Aadhaar (@UIDAI) January 19, 2022
Advertisement
आधार प्राधिकरणाने याबाबत सोशल मीडियावर ‘पोस्ट’ करून माहिती दिली आहे. त्यानुसार, खुल्या बाजारात तयार केलेले ‘पीव्हीसी कार्ड’, ‘प्लास्टिक कार्ड’ किंवा ‘आधार स्मार्ट कार्ड’ वैध राहणार नाही. फक्त आधार प्राधिकरणाने जारी केलेले आधार पीव्हीसी कार्डच वैध असतील, असे आधार प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आले आहे.
आधार कार्डचे ‘स्मार्ट कार्ड’मध्ये रुपांतर केल्याने त्यात सुरक्षाविषयक त्रूटी राहतात. अशा कार्डमध्ये सुरक्षाविषयक फिचर्स नसल्याने अशी कार्ड अवैध घोषित करीत असल्याचे आधार प्राधिकरणाने म्हटलं आहे.
मूळ आधार कार्डवरील फिचर्स..
आधारचे ‘पीव्हीसी कार्ड’ हवे असल्यास फक्त 50 रुपये भरून ते अधिकृतरीत्या मिळविता येते. आधार प्राधिकरणाकडून ते पोस्टाने पाठविले जाते. त्यात डिजिटली साईन सुरक्षित क्यूआर कोड असतो. ते छायाचित्रासह येते. त्यात लोकसांख्यिकी तपशील (डेमाॅग्राफिक डिटेल्स), शिवाय सर्व सुरक्षा फिचरही असतात.
- सुरक्षित क्यूआर कोड
- होलोग्राम
- मायक्रो टेक्स्ट
- कार्ड जारी केल्याची व प्रिंट केल्याची तारीख
- लोकसांख्यिकी तपशील
मूळ आधार कसे मिळवाल..?
- मूळ आधार कार्डसाठी https://myaadhaar.uidai.gov.in/ या संंकेतस्थळावर जा.
- नंतर तेथे ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ या पर्यायावर क्लिक करा.
- तेथे 12 अंकी आधार क्रमांक अथवा 28 अंकी नोंदणी आयडी टाका. सुरक्षा कोड भरा
- नंतर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल. त्यानंतर अटी व शर्ती स्वीकृत करा.
- ओटीपी पडताळणीसाठी सबमिट बटन दाबल्यानंतर ‘पेमेंट ऑप्शन’ दिसेल. तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे पैसे अदा करू शकता. पैसे अदा झाल्यानंतर पावती मिळेल आणि कार्ड पोस्टाने घरपोच येईल.