SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एसबीआय’चे एटीएम झाले अधिक सुरक्षित, बॅंकेकडून एटीएम वापराच्या नियमांत महत्वाचा बदल..!

स्टेट बॅंक ऑफ इंडिया.. अर्थात ‘एसबीआय’.. देशातील सर्वात मोठी बॅंक.. या बॅंकेच्या खातेदारांसाठी एक मोठी बातमी आहे. एसबीआयचे एटीएम कार्ड आता अधिक सुरक्षित झाले आहे. कारण, बॅंकेने एटीएममधून पैसे काढण्याचा नियमांत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन बॅंकेने हे बदल केले आहेत.

आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी, त्यांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी ‘एसबीआय’ सतत पावले उचलत असते. वेगवेगळे निर्णय घेत असते. आताही या बॅंकेने एटीएम वापराच्या नियमांत काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. चला तर मग ते जाणून घेऊ या..

Advertisement

‘एसबीआय’चा नवा नियम.. 

Advertisement

एसबीआय (SBI) बॅंकेच्या ग्राहकांना आता एसबीआय एटीएममधून पैसे काढायचे झाल्यास, ओटीपी (OTP) द्यावा लागणार आहे, त्याशिवाय व्यवहार पूर्ण होऊच शकत नाही. ‘एसबीआय’ एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यावर बॅंकेत नोंदणी केलेल्या मोबाईलवर हा ‘ओटीपी’ येईल. तो टाकल्यावरच पुढची प्रक्रिया होणार आहे.

एसबीआय एटीएममध्ये पैसे काढायला जाण्यापूर्वी सोबत मोबाईल असणं अत्यंत आवश्यक आहे. एटीएममधून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच आहे. मात्र, त्यात थोडासा बदल करण्यात आला आहे. आता एटीएम पिन टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ‘ओटीपी’ येईल, तो ओटीपी टाकल्यावरच रक्कम तुम्हाला मिळेल.

Advertisement

सध्या सर्वच एटीएममध्ये फक्त एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकून कार्डचा पिन टाकला, की पैसे काढता येतात. परंतु, त्यातून ग्राहकांच्या फसवणूकीचे प्रकार समोर आले होते. ही बाब लक्षात घेऊन ‘एसबीआय’ने आता ‘ओटीपी’च्या रूपात सुरक्षेचा आणखी एक स्तर ठेवला आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्ती तुमच्या कार्डद्वारे पैसे काढू शकणार नाही.

कुठे कुठे चालेल हे फिचर..?
ग्राहकांचे आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने हा नवा नियम केला आहे. मात्र, ते फक्त एसबीआयच्याच एटीएमवरच चालणार आहे. एसबीआय एटीएममधून पैसे काढतानाच ही प्रक्रिया केली जाणार आहे. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना, ‘ओटीपी’ टाकावा लागणार नाही..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement