SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नागरिकांना मिळणार आता ई-पासपोर्ट..! त्याचा काय फायदा होणार, अर्ज कसा करायचा, वाचा..!

जगात कुठेही जायचे म्हटलं, तरी सगळ्यात आधी मागणी केली जाते, ती पासपोर्टची.. सध्या देशात पुस्तकाच्या स्वरुपात नागरिकांना पासपोर्ट दिले जातात. मात्र, आता त्यात बदल होणार आहे. भारतात लवकरच नागरिकांना ई-पासपोर्ट दिले जाणार आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी साध्या-सोप्या नि सुरक्षित होणार आहेत..

पुस्तकाच्या रुपात दिला जाणारा पासपोर्ट लवकरच इतिहासजमा होणार आहे. भारत सरकारकडून लवकरच नागरिकांना ई-पासपोर्ट देण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी दिली.

Advertisement

भारतासाठी ई-पासपोर्ट अगदीच नवा आहे, असंही नाही. भारतातील पहिला ई-पासपोर्ट 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना जारी करण्यात आला होता. सध्या प्रायोगिक तत्वावर देशातील अधिकारी, मुसद्दींना 20 हजार ई-पासपोर्ट देण्यात आले आहेत.

‘टीसीएस’ला ई-पासपोर्टचे काम
देशातील सर्व नागरिकांना पासपोर्ट दिले जातील.. त्यासाठी ‘टाटा’ची आघाडीची कंपनी ‘टीसीएस’ कंपनीला ई-पासपोर्ट (e- passport) तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. ‘टीसीएस’ कंपनी ई-पासपोर्ट तयार करणार असली, तरी ते देण्याचा पूर्ण अधिकार सरकारचा असेल.

Advertisement

ई-पासपोर्ट नेमका कसा असेल, याबाबत लोकांमध्ये कुतुहल आहे. याबाबत ‘टीसीएस’कडून माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ई-पासपोर्ट पूर्णपणे पेपर-मुक्त नसेल. त्यात काही कागदपत्रेही असतील. पेपरची आवश्यकता असेल, कारण व्हिसा स्टॅम्पिंग अजूनही सुरु आहे, जे कागदावर केले जाऊ शकते. मात्र, नंतर ऑटोमेशनद्वारे कागदपत्रांची गरज राहणार नाही..

जगातील अनेक देशांकडे ई-पासपोर्ट सेवा आहे, तर काही देशांत त्यावर काम सुरु आहे, पण भारताचा ई-पासपोर्ट उर्वरित देशापेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. ई-पासपोर्ट जॅकेटमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप असेल, त्यात पासपोर्ट धारकाची वैयक्तिक माहिती असेल. त्यावर डिजिटल स्वाक्षरी असेल, त्यामुळे कुठल्याही देशात गेल्यास तुमच्या स्वाक्षरीची पडताळणी करणे सोपे जाईल. त्यामध्ये कोणतेही बदल करणे सोपे असणार नाही.

Advertisement

ई-पासपोर्ट अधिक सुरक्षित करण्यासाठी केवळ बोटांचे ठसेच घेतले जाणार नाहीत, तर आयरिस, म्हणजेच डोळ्यांच्या बुबुळांचा वापर होणार आहे. त्यामुळे पासपोर्टचा चुकीचा वापर करून होणारी फसवणूक रोखता येणार आहे. शिवाय सरकार डिजिटल पासपोर्ट जारी करण्याचा विचार करीत आहे. हे डिजिटल पासपोर्ट स्मार्टफोनमध्येही सेव्ह करता येणार आहेत.

ई-पासपोर्ट कधी मिळेल..?
ई-पासपोर्ट मिळविण्यासाठी आताच्या पद्धतीनेच अर्ज प्रक्रिया करावी लागेल. सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना ई-पासपोर्ट मिळतील. तोपर्यंत नेहमीप्रमाणेच पासपोर्ट मिळणार आहेत. मात्र, सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement