गेल्या काही दिवसांपूर्वी टेलिकाॅम कंपन्यांनी आपल्या रिजार्च प्लॅनच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. अशाच काही कंपन्यांनी सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा देणारे प्लॅन जाहीर केले आहेत.
रिलायन्स जिओचे (Jio) प्लॅन इतर टेलिकाॅम कंपन्यांच्या तुलनेत काहीसे कमी आहेत. शिवाय जिओकडून ग्राहकांना अन्य सुविधाही दिल्या जात आहेत. रिलायन्स जिओमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्या बंपर डेटासोबतच कॉलिंग ऑफर देतात.
रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच 249 रुपये व 239 रुपयांचे दोन प्रीपेड प्लॅन बाजारात आणले होते. या दोन्ही प्लॅनला ग्राहकांची चांगली पसंती आसल्याचे दिसते. विशेष म्हणजे, या दोन्ही प्लॅनमध्ये फक्त 10 रुपयांचा फरक असल्याने त्यात नेमका काय फरक आहे, याची अनेकांना उत्सुकता आहे. चला तर मग या दोन्ही प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
जिओचा 249 रुपयांचा प्लॅन
– रिलायन्स जिओकडून या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो.
– अमर्यादित कॉलिंगचाही फायदा, तसेच या प्लॅनची 23 दिवसांची वैधता आहे.
– प्लॅनची वैधता पाहिल्यास एकूण 46GB डेटा ऑफर केला जातो.
– प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस फ्री मिळतात
– या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा लाभ घेता येतो.
जिओचा 239 रुपयांचा प्लॅन
– जिओकडून रोज 1.5GB डेटा ऑफर केला जातो.
– या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून, तुम्हाला एकूण 42GB डेटा मिळतो.
– प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग
– दररोज 100 मोफत एसएमएसही मिळतात
– या प्लॅनमध्ये जिओच्या सर्व अॅप्सचा लाभ घेता येतो.