सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचायतीच्या खुल्या झालेल्या जागांसाठी नुकतेच मतदान झाले होते. त्याचे निकाल आज जाहीर होत असून, सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या या निकालाबाबत…
अहमदनगर
पारनेर नगरपंचायतमध्ये त्रिशंकू परिस्थिती. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. शहर विकास आघाडी व अपक्षाच्या हाती सत्तेच्या चाव्या. (एकूण जागा-17) भाजप-1, शिवसेना-6, राष्ट्रवादी-7, अपक्ष- 1, शहर विकास आघाडी-2.
कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची वर्चस्व कायम. (एकूण जागा-17) – भाजप-2, राष्ट्रवादी- 12, काँग्रेस- 3
नाशिक
जिल्ह्यातील निफाडला शिवसेना; तर सुरगाणा, देवळा नगरपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवले. दिंडोरीत भाजपच्या केंद्रिय मंत्री डाॅ. भारती पवार यांना धक्का बसला..
सुरगाणा नगरपंचायत (एकूण जागा – 17) : भाजप- 08, शिवसेना- 06, माकप- 02, राष्ट्रवादी काँग्रेस- 01
देवळा नगरपंचायत (एकूण जागा 17) : भाजप – 15, राष्ट्रवादी– 2
निफाड नगरपंचायत (एकूण जागा – 17) : शिवसेना- 07, शहर विकास आघाडी – 04, राष्ट्रवादी काँग्रेस- 03, काँग्रेस – 01, बसपा- 01, इतर (अपक्ष )- 01.
दिंडोरी – (एकूण जागा – 17) : शिवसेना – 6, राष्ट्रवादी – 5, भाजप – 4, काँग्रेस – 2.
रत्नागिरी
दापोली व मंडणगड नगरपंचायतीसाठी शिवसेना नेते रामदास कदम व अनिल परब यांच्यातील संघर्षामुळे गाजते आहे. दापोली (एकूण जागा-17) – भाजप- 1, शिवसेना- 6, राष्ट्रवादी- 8, अपक्ष- 2.
सिंधुदूर्ग
जिल्ह्यातील वैभववाडी व कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. वैभववाडी नगरपंचायतीवर राणे गटाने वर्चस्व राखले आहे. वैभववाडी- (एकूण जागा 17)- भाजप 10, शिवसेना- 5, अपक्ष- 2.
कुडाळ (एकूण जागा 17)- भाजप- 8, शिवसेना 7, काँग्रेसला 2.
बुलढाणा
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने संग्रामपूर नगरपंचायतीत एकहाती बाजी मारली. मंत्री राजेंद्र शिंगणे आणि संजय कुटे यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जाते. संग्रामपूर- (एकूण जागा -17) : प्रहार – 12, काँग्रेस – 04, शिवसेना – 01.
नागपूर
जिल्ह्यातील हिंगणा नगरपंचायतीमध्ये भाजप आमदार समीर मेघे यांचे वर्चस्व कायम. एकूण जागा 17, भाजप – 9, राष्ट्रवादी – 5, शिवसेना – 1, अपक्ष – 2.
सांगली
कवठे महांकाळ नगरपंचायतीत (स्व.) आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता मिळविली. (एकूण जागा 17) : राष्ट्रवादी – 10, शेतकरी विकास पॅनेल – 6, अपक्ष – 1.
कडेगाव नगरपंचायतीत सत्तांतर झाले. काँग्रेसचे मंत्री विश्वजित कदम यांच्या गटाचा दारुण पराभव झाला. एकूण जागा-17, काँग्रेस – 5, भाजप – 11, राष्ट्रवादी – 1.
खानापूर नगरपंचायत (एकूण जागा 17)- काँग्रेस आणि सेना विकास आघाडी – 9, जनता विकास आघाडी – 7, अपक्ष – 1.
नांदेड
नगरपंचायतीच्या 51 पैकी काँग्रेसचा 33 जागांवर विजय, राष्ट्रवादी- 8, भाजप- 3, सेना- 3, एमआयएम- 3, अपक्ष-1
सातारा
दहिवडी (एकूण जागा 17) : भाजप – 5, शिवसेना –3, राष्ट्रवादी –8, इतर –1.
पाटण – राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रमसिंह पाटणकर गटाने 17 पैकी 15 जागा जिंकल्या, शिवसेना 2.
कोरेगाव- (एकूण जागा- 17) : राष्ट्रवादी- 4, इतर (अपक्ष)-13 (शिवसेना).
वडूज – (एकूण जागा- 17) : भाजप- 6, काँग्रेस- 1, राष्ट्रवादी- 5, इतर (अपक्ष)-4
लोणंद – (एकूण जागा- 17) भाजप- 3, काँग्रेस- 3, राष्ट्रवादी- 9+1=10 (चिट्ठीवरून), इतर (अपक्ष)-1
खंडाळा (एकूण 17) भाजप – 7, राष्ट्रवादी –10.
जालना
घनसावंगी- शिवसेना 7, राष्ट्रवादी 10
मंठा – भाजप 2, शिवसेना 12, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 2
जाफ्राबाद : भाजप 1, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 6, इतर 4
तिर्थपुरी : भाजप-2, शिवसेना-3, राष्ट्रवादी-11, काँग्रेस-1
बदनापूर : भाजप-9, राष्ट्रवादी-5, काँग्रेस-1, इतर-2
यवतमाळ
बाभूळगाव (एकूण जागा-17) : भाजप- 2, शिवसेना-6, काँग्रेस-4, राष्ट्रवादी-2, इतर(अपक्ष)-2, प्रहार – 1
चंद्रपूर
सावली (एकूण जागा- 17) : भाजप –03, काँग्रेस –14
पोंभूर्णा (एकूण जागा 17) : भाजप – 10, शिवसेना –04, काँग्रेस –01, इतर (वंचित) –02.
जिवती (एकूण जागा 17) : राष्ट्रवादी –06, काँग्रेस –06, इतर (गोंडवाना गणतंत्र पार्टी) –05.
गोंडपिपरी (एकूण जागा 17) : भाजप – 04, शिवसेना –02, राष्ट्रवादी –02, काँग्रेस –07, इतर –02
सिंदेवाही (17) : भाजप – 03, काँग्रेस –13, इतर –01.
कोरपना (17) : भाजप – 04, काँग्रेस –12, इतर ( शेतकरी संघटना) –01.