SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नगरपंचायत निवडणूक निकाल : राज्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व, खडसे-दानवे, धनंजय मुंडेंना धक्का…

राज्यातील 106 पैकी 97 नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. 9 नगरपंचायतींचे निकाल उद्या (ता. 20 जानेवारी) जाहीर होणार आहेत. भाजपला 24 नगरपंचायती व 416 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 25 नगरपंचायती आणि 387 जागा, काँग्रेसला 18 नगरपंचायती आणि 297 जागा, शिवसेनेला 14 नगरपंचायती आणि 300 जागा, तर 16 नगरपंचायती स्थानिक आघाड्यांना मिळाल्या आहेत.

बीडमध्ये पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का
बीड जिल्ह्यात पाच नगरपंचायतीसाठी निवडणुक झाली. त्यात आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायतीमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळविली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा सुरेश धस यांची चांगली साथ मिळाली. केजमध्ये काँग्रेसच्या ताब्यातून जनविकास आघाडीने सत्ता मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांना पराभव सहन करावा लागला आहे. पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भाजपाचे ज्येष्ठ नेते राजूभाऊ मुंडे यांच्या ताब्यातील वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यामुळे भाजपला मोठा धक्का समजला जात आहे.

Advertisement

दिग्गजांचे वर्चस्व
अमरावतीत मंत्री यशोमती ठाकूर यांनी वर्चस्व राखलं. नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे बेरजेचे राजकारण कामी आले. नांदेडमधील नायगाव, अर्धापूर, माहूर नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला निर्विवाद विजय मिळाला. विशेष म्हणजे, नायगावमध्ये तर काँग्रेसने सगळ्याच 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवला.. नायगाव पाठोपाठ अर्धापूरमध्ये काॅंग्रेसने 17 पैकी 10 जागांवर विजय मिळविला. माहूरमध्येही काँग्रेसने सत्ता मिळविली..

दरम्यान, औरंगाबादमध्ये भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यात शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना यश आलंय.

Advertisement

एकनाथ खडसे यांना धक्का
जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीत 17 पैकी शिवसेनेने सर्वाधिक 9 जागांवर विजय मिळविला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला केवळ 7 जागांवर विजय मिळवला..

आतापर्यंत जाहीर झालेले निकाल
हिंगोली
औंढा नागनाथ नगरपंचायत (एकूण जागा – 17) : शिवसेना- 9, काँग्रेस-4, भाजप-2, वंचित बहुजन आघाडी-2.
सेनगाव (एकूण जागा- 17) : शिवसेना-5, काँग्रेस-5, भाजप-5, राष्ट्रवादी काँग्रेस-2.

Advertisement
वर्धा
समुद्रपूर (17) : राष्ट्रवादी – 4, भाजपा – 4, कॉंग्रेस – 2, अपक्ष –2, बहुजन समाज पार्टी – 2, शिवसेना – 1, शेतकरी संघटना – 2.
रायगड
रायगडमध्ये 6 नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना 35, राष्ट्रवादी काँग्रेस 39, शेकाप 11, काँग्रेस 8, इतर 3, भाजपा 4 जागांवर विजयी झाले आहेत.

पोलादपूर – शिवसेना 10, भाजप 1, काँग्रेस 6,
तळा- शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 10, भाजप 3
माणगाव- शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस 8, इतर 2.
म्हसळा – शिवसेना 2,  राष्ट्रवादी काँग्रेस 13, काँग्रेस 2
खालापूर – शिवसेना 8, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शेकाप 7
पाली – राष्ट्रवादी काँग्रेस 6, शेकाप 4, शिवसेना 4, भाजप 2, अपक्ष 1.

नागपूर

कोरपना नगर पंचायत : काँग्रेस 12.
पोंभुर्णा : भाजपा – 10, शिवसेना – 4, वंचित बहुजन आघाडी – 2, काँग्रेस – 1.
गोंडपिंपरी – काँग्रेस – 7, भाजपा – 4, राष्ट्रवादी – 2, शिवसेना – 2, अपक्ष – 2.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement