SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विमान प्रवासातील ही गुपिते तुम्हाला माहितीय का..? क्रू मेंबरनेच केलेत अनेक खुलासे..!

विमान प्रवास हे अनेकांचे स्वप्न असते.. काहींचे ते सत्यात उतरते, तर काहींचे नाही.. मात्र, विमान प्रवासाबाबत अनेकांच्या मनात एकप्रकारचे कुतूहल कायम असते. प्रवासाचा वेळ वाचावा, म्हणून अनेक जण विमान प्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, अनेकदा विमान प्रवास करुनही अनेकांना त्यातील काही गुपिते माहिती नसतात..

विमानात शांत, दयाळू, सौम्य भाषेत बोलणारे नि कोणत्याही क्षणी मदतीसाठी क्रू मेंबर तत्पर असतात. प्रवाशांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी ते सतत तयार असतात. मात्र, याच ‘केबिन क्रू’ने विमानातील काही धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत.

Advertisement

प्रवाशांसोबत बोलताना अनेकदा या क्रू मेंबर्सना अनेक प्रकरणांमध्ये खोटे बोलावे लागते. याबाबत एका फ्लाइट अटेंडंटनेच खुलासा केला आहे. अर्थात प्रवाशांच्या सोयीसाठी, त्यांना त्रास होऊ नये, म्हणूनच त्यांना असे वागावे लागत असल्याचे सांगण्यात आले.. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या…

माहितीच देत नाहीत..
विमान प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाने ‘क्रू’ला काही विशिष्ट माहिती विचारल्यास, त्याबाबतची माहिती घेऊन परत येते, असे सांगण्यात येते.. मात्र, नंतर त्या प्रवाशाच्या सीटजवळ येतच नाहीत. याबाबत कुणी प्रश्न उपस्थित केल्यास, आम्ही माहिती का नाही मिळवू शकलो, याबाबत त्या हजार कारणे सांगू शकतात.

Advertisement

सेफ विमान प्रवासाबाबत..
विमानाच्या विंगवर लागलेल्या गॅफर टॅप, तुटलेले ओव्हरहेड लॉकर, फॉल्टी टॉयलेट, तुटलेल्या दरवाजांमुळे प्रवाशी घाबरतात. याबाबत विचारणाही करतात. त्यावर हे सगळं ठिक असल्याचे क्रू मेंबरकडून सांगण्यात येते. आपला विमान प्रवास हा सगळ्यात सेफ असल्याचे त्या ठणकावून सांगतात.

ड्रिंक्सचे फक्त आश्वासन..
विमान प्रवासादरम्यान आवडीचे पेय, स्नॅक्स मागवल्यास आता ते संपल्याचे सांगतात. दुसरे काहीतरी घेण्याचा आग्रह करतात. मूड चांगला असल्यास प्रवाशांच्या आवडीचे देऊ शकतो, परंतु अनेकदा त्या खोटे बोलतात.

Advertisement

स्वतःच घाबरतात..
प्रवासात कधी कधी विमानात विचित्र आवाज किंवा वास आल्यास प्रवासी विचारणा करतात. त्यावर त्या बऱ्याचदा असं घडत असतं, शांत राहा, असं सांगितलं जातं. मात्र, अनेक वेळा त्यांनीच असा आवाज पहिल्यांदा ऐकलेला असतो, पण आपण घाबरलोय, असं त्या दाखवत नाहीत. सतत चेहरा हसरा ठेवून ‘ऑल इज वेल’ असल्याचे सांगत असतात.

सतत ‘सॉरी’..
चूक असो वा नसो.. केबिन क्रू मेंबरच्या तोंडात एक शब्द कायम असतो, तो म्हणजे साॅरी… अगदी त्यांच्याशी संबंधित नसलेल्या चुकीबद्दल त्या माफी मागत असतात.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement