SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पंतप्रधान मोदींचा गोंधळ उडवणारा ‘टेलीप्राॅम्टर’ असतो तरी कसा..? वक्त्यांना त्याचा कसा फायदा होतो, वाचा

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’तर्फे दरवर्षी स्वित्झर्लंडमधील लँड वासर नदीच्या काठी असलेल्या दावोसमध्ये परिषद आयोजित करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाईन पद्धतीने मंगळवारपासून (17 जानेवारी) दावोस परिषदेला सुरुवात झाली. त्यात पहिल्याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून संवाद साधला..

दरम्यान, पंतप्रधान मोदी बोलत असताना, टेलीप्रॉम्टरमध्ये काहीतरी बिघाड झाला नि तो बंद पडला. त्यामुळे पंतप्रधान मोदींना मध्येच त्यांचे भाषण थांबवावे लागले. यावेळी त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला नि काही वेळ ते थोडेसे संतापल्याचे पाहायला मिळाले..

Advertisement

दरम्यान, नेटिझन्सनी ही संधी साधत वेगवेगळे मिम्स तयार करुन ते सोशल मीडियावर पोस्ट केले. विरोधकांनीही मोदी यांच्यावर टीका केली, पण ज्या टेलीप्रॉम्पटरमुळे त्यांचा गोंधळ उडाला, तो नेमका असतो तरी कसा, त्याचा वक्त्यांना कसा उपयोग होतो, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

टेलीप्राॅम्टर म्हणजे काय..?
1950च्या सुमारास हुबर्ट श्लाफी, फ्री बार्टन ज्युनियर व इरविंग बर्लिन कान यांनी या अनोख्या उपकरणाचा शोध लावला.. हे असं उपकरण आहे, ज्याच्या साहाय्याने वक्त्याला भाषण लक्षात ठेवायची गरज नसते. टेलीप्रॉम्प्टरच्या साहाय्याने तो सहज वाचून बोलू शकतो. शिवाय श्रोत्यांना ते समजतही नाही…

Advertisement

टेलीप्रॉम्टर कसं काम करतं..?
एखाद्या नेत्याला भाषण देताना, नीट पाहिल्यास नेत्याच्या शेजारी दोन मोठ्या काचा लावलेल्या असतात. या काचा म्हणजेच टेलीप्रॉम्प्टर ग्लासेस..! त्यावर नेत्यांना आपले भाषण स्पष्ट दिसते. मात्र, सर्वसामान्य लोकांना तेथे फक्त एक सामान्य काच असल्याचे दिसते..!

टेलीप्रॉम्टरची रचना..
यामध्ये दोन उपकरणे असतात. पहिला ‘टेलीप्रॉम्टर स्टँड’ नि ‘रिफ्लेक्टेड’ काच, तर दुसरा मॉनिटर. स्टँडवरील टेलीप्रॉम्टर काच 45 अंश डिग्रीमध्ये वाकवून सेट केली जातो. मॉनिटर अगदी त्याखाली असतो. सॉफ्टवेअरच्या मदतीने स्क्रीप्ट दिसते. स्क्रीनवरील भाषण वक्ता सहज वाचू शकतो.

Advertisement

पूर्वी त्याचा वेग, आकार मॅन्युअली अपडेट होत असे, पण आता ऑटोमॅटिक झालंय. वक्त्याच्या बोलण्याच्या वेगानुसार, टेलीप्रॉम्टरवरील स्क्रीप्ट पुढे पुढे सरकते.

टेलीप्रॉम्टरचे प्रकार…
अध्यक्षीय टेलीप्रॉम्टर – पंतप्रधान मोदी वापरतात, तो हाच टेलीप्रॉम्टर.. राजकीय भाषणे देण्यासाठी याचा वापर होतो. एका उंच स्टँडवर 45 अंश कोनात वाकवून काच बसवली जाते. त्याखाली टॅब किंवा मॉनिटर असतो. त्याचे प्रतिबिंब या काचेवर पडते. वक्ता या काचेवर पाहून बोलतो. ही काच परावर्तनीय असल्याने बोलणारा वाचून बोलतोय, असं वाटत नाही.

Advertisement

कॅमेरा टेलीप्रॉम्प्टर – बातम्या वाचण्यासाठी, चित्रपट रेकॉर्ड करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात टेलीप्रॉम्टरच्या काचेच्या मागे कॅमरा असतो. आतल्या भागात काचांवर बातम्या, संवाद चालू असतात. अँकर किंवा अभिनेता आरशात पाहून ते बोलतात. आरशामागे बसवलेला कॅमेरा ते रेकॉर्ड करतो. काचेवर लिहिलेलं फक्त आत बसलेल्या व्यक्तीला दिसतं, बाहेर फक्त अँकर नि आवाज ऐकू येतो.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement