SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘टू-व्हिलर’च्या किंमती कमी होणार..? मोदी सरकार ‘जीएसटी’ कमी करण्याच्या विचारात..?

‘टू-व्हिलर’ खरेदीचा प्लॅन असल्यास, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांत टू-व्हिलरच्या किंमती गगणाला भिडल्या होत्या. मात्र, लवकरच त्या कमी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मोदी सरकार आगामी बजेटमध्ये याबाबत मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येते.

कोरोना महामारीमुळे अनेकांचे खिसे रिकामे झाले. नोकऱ्या गेल्या, उद्याेग-धंदे बसले. त्याचा परिणाम वाहन उद्योगावरही झाला. त्यात वाहनांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने अनेकांनी नवी गाडी घेण्याऐवजी ‘सेकंड हॅंड’वरच काम भागवले.. परिणामी, नव्या गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे.

Advertisement

दुचाकीवर तब्बल 28 टक्के ‘जीएसटी’ (वस्तू व सेवाकर) आहे. त्यामुळे साधी नवी गाडी घ्यायला गेले, तरी त्याची किंमत ऐकूनच डोळे पांढरे होण्याची वेळ येते. विशेष म्हणजे, लक्झरीयस गाड्यांवर आकारण्यात येणारा ‘जीएसटी’ दर दुचाकीसाठीही आहे..

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स (FADA) ही संघटना देशातील 15,000 हून अधिक ऑटोमोबाईल डीलर्सचे प्रतिनिधीत्व करते. या संघटनेने टू-व्हीलरवरील ‘जीएसटी’ दर 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती वित्त मंत्रालयाला केली आहे.

Advertisement

दुचाकी लक्झरी उत्पादन नाही
दुचाकी हे काही लक्झरी उत्पादन नाही. चैनीची वस्तू म्हणून कोणीही दुचाकीचा वापर करीत नाही. सर्वसामान्य लोक दैनंदिन कामासाठी दुचाकी वापरतात. त्यामुळे दुचाकीवर 28 टक्के ‘जीएसटी’सह 2 टक्के उपकर लावणे योग्य नाही. लक्झरीयस उत्पादनांवर सेस लावला जात असल्याचे ‘एफएडीए’ने म्हटले आहे.

मागील काही दिवसांत कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यात ‘जीएसटी’चा मोठा भार पडल्याने वाहन उद्योग निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही दुचाकीच्या किंमतीत मोठी वाढ करावी लागली. दुचाकीच्या किंमती वाढल्याने मागणीत मोठी घट झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

Advertisement

दरम्यान, येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटमध्ये ‘टू-व्हीलर’वरील ‘जीएसटी’ दर 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती संघटनेने केली आहे.

दरम्यान, मोदी सरकारने दुचाकीवरील ‘जीएसटी’ दर कमी करण्याचा निर्णय घेतल्यास, गाड्यांच्या किंमती बऱ्याच कमी होऊ शकतात. त्यामुळे मोदी सरकारच्या आगामी बजेटकडे साऱ्या देशाचे लागले आहे.

Advertisement

10 वर्षांत सर्वात कमी विक्री
एप्रिल ते डिसेंबर-2021 या काळात दुचाकी विक्रीने गेल्या 10 वर्षातील नीच्चांकी पातळी गाठली. 2020 च्या तुलनेत एप्रिल ते डिसेंबर 2021 मध्ये फारच कमी दुचाकींची विक्री झालीय. मात्र, या काळात प्रवासी कार व प्रीमियम कारच्या विक्रीत वाढ झाल्याचे ‘एसआयएएम’च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement