SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घोकंमपट्टीपासून विद्यार्थ्यांची सुटका, नव्या शिक्षण पद्धतीत आता मोठ्या प्रमाणात बदल होणार..

शैक्षणिक क्षेत्राबाबत एक महत्वाची बातमी आहे. मागील कित्येक दशकांपासून चालत आलेल्या शैक्षणिक पद्धतीत आता आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. त्यासाठी मोदी सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात येत होते. लवकरच या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भारतीय शिक्षण पद्धतीत 10+2 असे धोरण अनेक दशकांपासून चालले होते. पालकांकडूनही दहावी व बारावीच्या परीक्षांना अनन्यसाधारण महत्व दिले होते. मात्र, आता नवीन शैक्षणिक धोरणात या पद्धतीत मोठे बदल केले जाणारआहेत. त्यानुसार आता 5+3+4 असे टप्पे केले जाणार असल्याचे समजते.

Advertisement

नव्या धोरणानुसार पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी, असे हे टप्पे असतील. त्याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून (2022-23) केला जाणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने सरकारी पातळीवर जोरदार तयारी असल्याचे समजते..

नवीन शैक्षणिक धोरणाविषयी गेल्या दोन वर्षांपासून शैक्षणिक वर्तुळात चर्चा होत होती. नव्या शैक्षणित धोरणांमधील बदलांवर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वेगवेगळी मते मांडली जात होती. या धोरणातील चांगल्या बाबी, तसेच कोणत्या गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज आहे, याविषयी माहिती मागवण्यात आली होती.

Advertisement

आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच या नव्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे.

पायाभूत, प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक वर्ग, याप्रमाणे हे टप्पे केले जातील. त्यातील नववी ते बारावीचा टप्पा शालेय जीवनातील सर्वाधिक महत्त्वाचा असणार आहे. दहावीपर्यंत शाळा व अकरावीपासून कॉलेज, अशी पद्धत आपल्याकडे होती. आता किमान बारावीपर्यंतचा समावेश शालेय टप्प्यातच असेल.

Advertisement

नव्या धोरणांतील महत्वाच्या बाबी
– शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर, या पद्धतीला चाप बसणार आहे.. वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार, समस्यांचे निराकरण, सहकार्य, डिजिटल शिक्षण आदी विषयांचा समावेश असेल.

– शिक्षकांसह पालकांनाही जागरुक करण्यावर भर दिला जाणार
– प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेला प्रोत्साहन देण्यास प्राथमिकता दिली जाईल.
– वैचारिक आकलनावर भर असेल. सर्जनशीलता व समालोचनात्मक विचारसरणीला पुढे नेले जाणार.

Advertisement

– विद्यार्थ्यांसाठी कला व विज्ञान यांच्यात वेगळेपणा, अडचण येणार नाही.
– नीतीमत्ता व घटनात्मक मुल्ये अभ्यासक्रमाचा प्रमुख भाग असेल.

– संगीत, कला, तत्वज्ञान, नृत्य, नाट्य, उच्च संस्थांचे शिक्षण अभ्यासक्रम यांचा नव्या धोरणात समावेश असेल.
– बॅचलर पदवी 3 ते 4 वर्षांच्या कालावधीसाठी असेल.
– 2050 पर्यंत किमान 50 टक्के विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणात भाग घ्यावा लागेल..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement