SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अहमदाबाद फ्रँचायझीने निवडले आपले तीन खेळाडू, या स्टार खेळाडूंना दिले संघात स्थान..

क्रिकेट रसिकांसाठी एक मोठी बातमी आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL-2022) अहमदाबाद व लखनऊ या दोन नव्या संघांची एन्ट्री झाली आहे. अहमदाबाद व लखनऊ या दोन नव्या फ्रँचायझींना 90 कोटी रुपयांची पर्स देण्यात आली आहे.

सध्या लिगमध्ये असलेल्या 8 फ्रँचायझींना प्रत्येकी 4 खेळाडू कायम राखण्याची मुभा दिली होती, परंतु अहमदाबाद व लखनऊ यांना प्रत्येकी 3 खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी करारबद्ध करता येणार आहे. नव्या फ्रँचायझींना तीन खेळाडूंसाठी 15, 11 व 7 कोटी रुपये रक्कम द्यावी लागणार आहे.

Advertisement

हार्दिकवर नेतृत्वाची जबाबदारी..?
दरम्यान, अहमदाबाद फ्रंचायझीने हार्दिक पांड्या व राशिद खान यांना प्रत्येकी 15 कोटी रुपयांत खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. तसेच संघाचे नेतृत्वही हार्दिक पांड्याकडेच दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

भारताचा उदयोन्मुख खेळाडू शुभमन गिल याचीही अहमदाबाद फ्रंचायझीने आपल्या संघात निवड केली असून, त्याला 7 कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे अहमदाबाद फ्रंचायझीकडे आता आयपीएलच्या मेगा ऑक्शनसाठी 53 कोटी रुपये शिल्लक राहणार आहेत.

Advertisement

हार्दिक पांड्या यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाकडून, तर राशिद खान हा सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळले आहेत. प्रथमच ते एकाच संघातून खेळणार आहेत. 2015 मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने 10 लाख रुपयांत खरेदी केले होते. 2018 नंतर तो भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला.

हार्दीकच्या धडाकेबाज कामगिरीमुळे नंतर मुंबईने त्याला त्याच वर्षी 11 कोटींमध्ये आपल्या ताफ्यात कायम राखले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो खराब फाॅर्ममधून जात असल्याने यंदा मुंबईने त्याला रिटेन केले नव्हते.

Advertisement

2017 मध्ये हैदराबादने राशिद खान याला 4 कोटींमध्ये खरेदी केले होते. आयपीएलमध्ये राशीदने आपल्या गोलंदाजीने अनेकांना घाम फोडला. त्याच्या कामगिरीमुळे हैदराबादने पुढच्याच पर्वात 9 कोटी रुपयांमध्ये कायम राखलं होते. 2018 मध्ये शुभमन गिलसाठी कोलकाता नाइट रायडर्सनं 1.8 कोटी रुपये मोजले होते.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement