SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘पुष्पा’ सिनेमातील मजेदार किस्सा..! दाढीखालून हात फिरवण्याची स्टाईल कशी सूचली..? वाचा

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa : The Rise) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत मोठी कमाई केलीय. जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही हा सिनेमाने कमाईचे कोट्यवधींचे आकडे गाठले आहेत. त्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरही गाजतो आहे. हा चित्रपट ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वरही प्रदर्शित झालाय.

‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर ही चित्रपट हिंदी भाषेत रिलिज करण्यात आला असून, त्याला डबिंगमध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याने अल्लू अर्जुनला, म्हणजेच ‘पुष्पा’ला आवाज दिलाय. हिंदी व्हर्जन ‘ओटीटी’वर आल्यानंतर देशभरातील चाहते अल्लू अर्जुनचे कौतुक करताना दिसत आहेत.

Advertisement

‘पुष्पा’च्या भूमिकेतील अल्लू अर्जुनची स्टाईल काॅपी केली जात आहे. अगदी तोंडात बीडी पकडण्याच्या ‘पुष्पा’च्या शैलीवरही चाहते फिदा झाले आहेत. सर्वसामान्य तरुणच नव्हे, तर अगदी भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वाॅर्नरला ‘पुष्पा’ची भुरळ पडल्याचे दिसत आहे.

बीडी पकडण्याच्या स्टाईलबरोबरच अल्लू अर्जुनची ‘श्रीवल्ली’ गाण्यातील पाय घसरत चालण्याची डान्स स्टेप असो, की मग दाढीखालून हात फिरवण्याची अ‍ॅक्शन.. अनेक जण ‘पुष्पा’च्या शैलीत व्हिडीओ तयार करुन ते सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळते.

Advertisement

अल्लू अर्जुन याने एका चंदन तस्कराची भूमिका साकारली असून, त्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतल्याचे दिसत आहे. मोठी दाढी, एक खांदा वाकून चालणं, लुंगी, असा सारा दाक्षिणात्य पेहराव नि भूमिकेसाठी आवश्यक शैली अल्लू अर्जुनने खास स्टाईलमध्ये सादर केलीय..

दाढीच्या स्टाईलचा किस्सा
दाढी खालून हात फिरवत ‘आपण कोणासमोरही झुकणार नाही..’ असं ‘पुष्पा’ त्याच्या विरोधकांना सांगतानाचे काही दृश्य तरुणांच्या पसंतीस उतरले आहे. दाढीखालून हात फिरवण्याची स्टाइल कुठे सुचली, याचा एक मजेशीर किस्सा अल्लू अर्जुनने नुकताच एका मुलाखतीत सांगितला.

Advertisement

या चित्रपटातील मारामारीचा एक सीन संपत आल्यावर अल्लू अर्जुनने सहज दाढीवरुन हात फिरवला. ही स्टाईल दिग्दर्शक सुकुमार यांना भारी आवडली.. त्यांनी अल्लू अर्जूनला याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, की “ही जी अ‍ॅक्शन केलीय ना, ती फार छान आहे. आपण घेऊ यात ही चित्रपटामध्ये..!”

अल्लू अर्जुनच्या या दमदार स्टाईलला जोड देण्यासाठी दमदार डायलाॅगची गरज होती. त्यावर ‘झुकेगा नही’ हा डायलाॅग देण्यात आला नि चित्रपटात अनेक ठिकाणी वापरण्यात आला असून, त्याला रसिकांची मोठी दाद मिळतेय..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement