SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राजीनामा देण्यापूर्वी विराटचा गांगुलीला फोन.. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, वाचा..!

टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी कॅप्टन विराट कोहलीने अचानक कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने साऱ्या क्रिकेट रसिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विराटने भारतीय संघाला अभूतपूर्व यश मिळवून दिले. टी-20 व वन-डे कर्णधार पद सोडल्यावर काही दिवस तरी तो टेस्टमध्ये कॅप्टन असेल, असे बोलले जाते होते.

विराटने राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नेमकं काय घडलं, याची सर्वांना उत्सुकता आहे. विराटने तडकाफडकी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यावर अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत.

Advertisement

विराटला एकदाही या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले गेले नाही. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह यांना कर्णधारपद सोडण्याबाबत विराटने कळवताच, त्यांनी त्याचा निर्णय लगेच मान्य केल्याचे समोर येत आहे.

केपटाऊन येथील टेस्टमध्ये पराभव झाल्यावर विराटने सुरुवातीला सौरव गांगुली याला राजीनाम्याची माहिती दिली. त्यावर गांगुलीने विराटच्या राजीनाम्याचा निर्णय लगेच स्वीकारला.. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने आधीच याबाबत तयारी केली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, ‘विराटने शनिवारी (ता. 15) दुपारी 1 वाजता कर्णधारपद सोडण्यापूर्वी काही तास आधी सौरव गांगुली आणि जय शहा यांना आपल्या निर्णयाची कल्पना दिली. विराटने अचानक घेतलेला निर्णय ऐकून त्यांनाही काही क्षण आश्चर्य वाटले, पण त्यांनी विराटला या निर्णयाचा फेरविचार करण्याची सूचना केली नाही.

विराट कोहलीने आधीच कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नव्हता. टी-20 टीमचे कर्णधार पद सोडल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे विराटच्या निर्णयावर बोलणे टाळण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

दौऱ्यावर जाण्यापूर्वीच निर्णय..
केपटाऊन टेस्ट संपल्यानंतर शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी विराटने टीममधील आपल्या सहकाऱ्यांना या निर्णयाची कल्पना दिली होती. मात्र, सध्या ही बातमी स्वत:जवळच ठेवा, असे त्याने सांगितले होते. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जातानाच त्याने कॅप्टन म्हणून हा शेवटचा दौरा असेल, असे ठरवल्याचे मानले जात आहे. विजयासह कर्णधार पदाच्या प्रवासाचा त्याला शेवट करायचा हाेता. मात्र, त्याची इच्छा पूर्ण झाली नाही.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement