रेशनकार्ड.. अर्थात शिधापत्रिका.. एक महत्वाचा सरकारी दस्तावऐवज.. या रेशनकार्डच्या माध्यमातून सरकार विविध योजना राबवित असते. रेशनकार्डमुळे गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य पुरवठा केला जातो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठीच हे रेशनकार्ड महत्वाचे मानले जाते..
रेशनकार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अनेकदा नागरिकांकडून रेशनकार्डला चुकीचा मोबाईल नंबर लिंक केला जातो किंवा बऱ्याच वेळा नंबर बदलण्यात येतो.. मात्र, तो रेशनकार्डवर अपडेटच केला जात नाही. त्यामुळे चुकीचा नंबर रेशनकार्डला लिंक असल्यास, तुमच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे लगेच मोबाईल नंबर अपडेट करा..
खरे पाहता, रेशनकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे, अतिशय सोपे आहे. अगदी सहज घरबसल्या तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करु शकता. त्यासाठी काय करायला लागेल, याबाबत जाणून घेऊ या..
असा करा मोबाईल नंबर अपडेट
– सुरवातीला https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या संकेतस्थळावर जा.
– संकेतस्थळावर ‘Update Your Registered Mobile Number’ या पर्यायाव क्लिक करा.
– पहिल्या कॉलममध्ये ‘Aadhaar Number of Head of Household/NFS ID’ असं लिहा.
– दुसऱ्या कॉलममध्ये ‘Ration Card No.’ टाका, तर तिसर्या कॉलममध्ये घरप्रमुखाचे नाव लिहा.
– शेवटच्या कॉलममध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर टाकून सेव्ह करा. तुमचा मोबाईल नंबर अपडेट केला जाईल.
कुठेही मिळणार धान्य..
दरम्यान, मोदी सरकारने 1 जून 2020 पासून ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ योजना सुरु केली आहे. देशातील 20 राज्ये नि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या ही योजना सुरु आहे.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि दमण-दीवमध्ये आधीच ही योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही आता कोणत्याही राज्यात, शहरात राहून गावाकडच्या रेशनकार्डवर स्वस्त धान्य खरेदी करू शकता.