SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उदयनराजेंनाही ‘पुष्पा’ सिनेमाची भुरळ..! लुंगी घालून ‘सामी सामी’ गाण्यावर उडवली काॅलर..

सध्या देशभरात एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. तो म्हणजे, साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा : द राईज’.. सध्या या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यातील गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. अगदी लहान-थोर या चित्रपटातील गाण्यांवर थिरकत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते.

‘पुष्पा’ चित्रपटाने यशाचे अनेक विक्रम मोडले आहेत. चित्रपटाची कथा नि कलाकारांचा अभिनय जबरदस्त आहेच, पण त्यातील गाण्यांनीही धमाल उडवलीय.. या चित्रपटातील ‘सामी सामी’ या गाण्याची चक्क भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही भुरळ पडलीय.

Advertisement

आपल्या ‘हटके स्टाईल’साठी उदयनराजे भोसले हे प्रसिद्ध आहेत. मग ते काॅलर उडविणे असो की एखाद्या चित्रपटातील डायलाॅग.. अफलातून पद्धतीने उदयनराजे भोसले सादर करीत असतात. तेही ‘पुष्पा’ सिनेमाच्या प्रेमात पडले आहे.

उदयराजेंनी पुन्हा काॅलर उडवली
साताऱ्यातील पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये चक्क पांढरी ‘लुंगी’ घालून आले होते. तेथे त्यांनी जोरदार फोटोसेशनही केले. त्यांच्यासोबत समर्थकही दाक्षिणात्य पद्धतीने लुंगी परिधान करुन आले. एवढंच नाही, तर कारमध्ये बसताना ‘सामी सामी’ गाण्यावर त्यांनी नेहमीच्या स्टाईलने आपली कॉलरही उडवली.

Advertisement

दरम्यान, ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर फोटोसेशन झाल्यावर कारकडे निघालेल्या उदयनराजे यांना माध्यमांनी लुंगी घालण्याचे कारण विचारले असता, त्यांनी ‘काही नाही, मला बरं वाटतं…’ असं उत्तर दिलं.. त्यानंतर ते कारमध्ये जाऊन बसले. त्यावेळी कारमध्ये ‘सामी सामी’ हे गाण सुरु होतं. त्यावर ठेका धरीत उदयनराजे यांनी निघताना आपल्या स्टाईलमध्ये काॅलर उडवली..

खासदार उदयनराजे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यावर लाईक्स नि कमेंटचा पाऊस पडत आहे. उदयनराजे यांच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement