SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, इंडियन ऑईल काॅर्पोरेशनमध्ये 570 जागांसाठी भरती…!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) येथे तब्बल 570 जागांसाठी नोकर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून, उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Indian Oil Corporation Limited Maharashtra jobs) महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, तसेच केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली अशा विविध ठिकाणी ही भरती होत आहे. त्यासाठी पात्रता, अर्ज कसा व कुठे करावा, अर्जासाठी किती तारखेपर्यंत मुदत आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 570

या पदांसाठी भरती
– टेक्निकल (Technical) व नॉन- टेक्निकल अप्रेंटिस (Non-technical apprentice posts)

Advertisement

राज्यानिहाय रिक्त जागा
– महाराष्ट्र : 212
– गुजरात : 61
– छत्तीसगड : 22
– गोवा : 3
– मध्य प्रदेश : 40

वयोमर्यादा – उमेदवाराचं वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावं.

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022

शैक्षणिक पात्रता
‘टेक्निकल’ अप्रेन्टिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखेतून डिप्लोमा पूर्ण झालेला असावा. मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेले असावं.

Advertisement

मॅकानिकल (Mechanical), इलेक्ट्रिकल (Electrical), इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation), सिव्हील (Civil), इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्राॅनिक्स (Electrical & Electronics) आणि इलेक्ट्राॅनिक्स शाखेतून डिप्लोमा झालेला असावा. काही जागांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे
बायोडेटा
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (राखीव उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

Advertisement

कुठे करणार अर्ज – https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement