SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आणखी एक भत्ता, जानेवारीच्या पगारात होणार मोठी वाढ..

कोरोना महामारीमुळे गेल्या काही दिवसांपासून केंद्रिय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) रखडला हाेता. मोदी सरकारने या महिन्यात केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या पगारात या महिन्यातच भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे..

केंद्रिय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रिय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याबरोबरच आणखी एका भत्त्याचा लाभही दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. या भत्त्याचे नाव ‘फिटमेंट फॅक्टर’…!

Advertisement

आधी महागाई भत्ता (DA), नंतर एचआरए (HRA) नंतर टीए (TA) नि आता नवीन वर्षात पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे मोठे गिफ्ट मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या गेल्या तीन वर्षांपासून होणाऱ्या ‘फिटमेंट फॅक्टर’च्या (Fitment Factor) मागणीबाबत आता मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

किमान वेतनात वाढ होणार
कर्मचाऱ्यांच्या ‘फिटमेंट फॅक्टर’मध्ये याआधी 2016 मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थेट 6000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले होते. आता पुन्हा या एकदा ‘फिटमेंट फॅक्टर’ची चर्चा सुरु आहे.

Advertisement

केंद्रिय कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 टक्के ‘फिटमेंट फॅक्टर’ मिळतो. मोदी सरकार आता त्यात 3.68 पर्यंत वाढ करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 8000 रुपयांची वाढ होणार असून, किमान वेतन मर्यादा 26000 रुपये होईल. किमान वेतनात मर्यादेत वाढ झाल्यास पुन्हा एकदा महागाई भत्त्यातही वाढ करावी लागणार आहे.

मोदी सरकारचा आगामी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. मात्र, अर्थसंकल्पापूर्वीच केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.

Advertisement

फिटमेंट फॅक्टर म्हणजे..
सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरवण्यासाठी ‘फिटमेंट फॅक्टर’ हे सूत्र आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, त्याची अंमलबजावणी करण्यात आली. केंद्रीय कर्मचार्‍यांचे किमा मूळ वेतन ‘फिटमेंट फॅक्टर’द्वारे निर्धारित केले जाते. ‘फिटमेंट फॅक्टर’नुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच पटीने वाढ होते.

दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ‘फिटमेंट फॅक्टर’मध्ये वाढ झाल्यानंतर किमान वेतन वाढणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाईल. सध्या कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळतो. या महिन्यात 3 टक्के वाढ झाल्यास 33 ते 34 टक्के ‘डीए’ मिळणार असून, कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement