SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी..! बांबू लागवड करा नि 40 वर्षे बसून खा.. सरकारही करतेय मदत

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी आहे. सध्याच्या काळात उत्पादन खर्च वाढल्याने शेती परवडत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून कायम केली जाते. मात्र, आता पारंपरिक शेतीला टाटा, बाय बाय करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरल्यास शेतीतून भरघोस कमाई करता येऊ शकते.

कमी कष्टात, कमी पाण्यावर, कमी भांडवलात नि तेही अगदी खडकाळ, डोंगराळ जमिनीतून दरवर्षी लाखोंचे उत्पन्न देणाऱ्या एका शेतीपिकाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे, या पिकासाठी सरकारही मदतीचा हात देते. ही पीक म्हणजे, बांबू लागवड..!

Advertisement

अगदी नापीक, निरुपयोगी जमिनीत बांबू लागवड करता येत असून, त्यातून शेतकऱ्याला दरवर्षी मोठी कमाई होऊ शकते. एकदा बांबू लागवड केली, तर अगदी 40 वर्षे काहीही न करता कमाई सुरु राहते. बांबू लागवडीसाठी मध्य प्रदेशमध्ये तर शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते.

मोदी सरकारनेही शेतीसाठी ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत बांबू लागवडीसाठी शेतकर्‍याला प्रति रोप 120 रुपयांचे सरकारी साहाय्य मिळेल. जानेवारी-2018 मध्ये केंद्र सरकारने बांबूचा झाडांच्या श्रेणीतून काढून गवताच्या श्रेणीत समावेश केला. त्यामुळे बांबू तोडण्यावर वन कायदा लागू होत नाही.

Advertisement

अर्थात, हा कायदा केवळ खासगी शेतकऱ्यांसाठी करण्यात आला आहे. जंगलातील बांबू तोडण्यास मनाई असून, तेथे कोणतीही सूट नाही. तेथे वन कायदा लागू होणार आहे.

बांबू शेती कशी करणार..?
बांबूची शेती हे एका हंगामातील पीक नाही. त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. बांबू तयार व्हायला सुमारे 4 वर्षे लागतात. चौथ्या वर्षी त्याची कापणी करता येते. साधारणपणे 3 बाय 2.5 मीटरवर बांबूचे एक रोप लावलं जातं. त्यातून सुमारे एक हेक्टरवर 1500 रोपे लावली जातील.

Advertisement

दोन रोपांमधील मोकळ्या जागेत आंतरपीकही घेता येता. दर 4 वर्षांनंतर बांबूची कापणी करता येते. त्यामुळे दरवर्षी त्याची लागवड करण्याची गरज नाही. एकदा बांबू लागवड केली, की ती 40 वर्षे टिकते. त्यातून दरवर्षी लाखो रुपयांची कमाई होते.

हे ध्यानात ठेवा…
बांबूच्या 136 प्रजाती आहेत. त्यामुळे बांबू शेती करण्यापूर्वी त्याच्या वाणांची माहिती असायला हवी. आपल्याला कोणत्या प्रकारचे बांबू लावायचे आहेत, आपण बाजारात ते कसे विकणार आहोत, याबाबत आधीच नियोजन करा..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement