SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘फेसबूक’ची दोन ‘स्मार्टवाॅच’ लवकरच बाजारात येणार, स्मार्टवाॅचची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी वाचा

तीन काट्यांचे मनगटी घड्याळ आता मागे पडत चालले असून, आता स्मार्टफोनच्या जोडीने स्मार्टवाॅचचा जमाना आलाय.. ‘ऑल इन वन’ सेवा देणाऱ्या स्मार्टवाॅचला ग्राहकांचीही चांगली मागणी आहे. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन वेगवेगळ्या कंपन्या रोज नवनवे दमदार फिचर्स असणारी ‘स्मार्टवाॅच’ बाजारात आणत आहेत.

ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन सोशल मीडियातील अग्रगण्य कंपनी फेसबूक अर्थात मेटानेही दोन स्मार्टवाॅच लाॅंच करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा मे ते एप्रिलदरम्यान मेटा कंपनीची स्मार्टवॉच बाजारात येण्याची शक्यता आहे.

Advertisement

‘मेटा’च्या या स्मार्टवॉचमध्ये ‘गोल स्क्रीन’ व ‘फ्रंट-फेसिंग कॅमेरा’ असणार आहे. या ‘स्मार्टवॉच’चे काही फोटो ‘ब्लूमबर्ग’ने ऑक्टोबर-2021 मध्ये जारी केले होते. ‘लेटस् गो डिजिटल’ (LetsGoDigital) ला आता ‘मेटा’ (Meta)च्या पहिल्या ‘स्मार्टवॉच’बद्दल अधिक माहिती मिळाली आहे. या स्मार्टवॉचमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत.

‘मेटा’च्या स्मार्टवाॅचची वैशिष्ट्ये
– ‘मेटा’च्या स्मार्टवॉचमध्ये ‘डिटॅचेबल डिस्प्ले’ आणि ‘ड्युएल’ कॅमेरे असतील.
– स्मार्टवॉचद्वारे युजर्सना थेट ‘फेसबूक’ व ‘इन्स्टाग्राम’वर व्हिडिओ शेअर करता येणार आहेत.
– दोन कॅमेरे असलेल्या स्मार्टवॉचमध्ये ‘व्हीआर’ (VR) आणि एआर (AR) अॅप्लिकेशनसाठी सपोर्ट उपलब्ध असेल.

Advertisement

– फेसबुक दोन स्मार्टवॉच लॉंच करणार असून, त्यात एक चौकोनी, तर दुसरा डिस्प्ले गोल असेल. त्यात डिटॅचेबल डिस्प्ले, म्हणजेच युजर्स डिस्प्ले काढून टाकू शकतात. शिवाय हार्ट रेट मॉनिटर, मोशन सेन्सर, बॉडी टेम्परेचर सेन्सर आणि अ‍ॅक्टिव्हिटी रेकग्निशन सेन्सरही असेल.

– स्मार्टवॉचेसद्वारे युजर्स व्हिडिओ कॉलही करता येईल. तसेच कंपनी एआर हेडसेटवर काम करीत असून, वर्षाअखेरीस दोन्ही प्राॅडक्ट एकदम लाँच करू शकते.

Advertisement

– स्मार्टवॉचमध्ये दोन ते तीन वेगवेगळ्या लेन्सचे कॅमेरे असतील. त्यात मॅक्रो लेन्स, टेलीफोटो लेन्स, ऑप्टिकल झूम लेन्स अथवा वाइड अँगल लेन्स असेल. युजर्स वॉच फिरवून वेगवेगळे कॅमेरे वापरू शकतील. एक कॅमेरा वापरताना, बाकीचे कॅमेरे आपोआप बंद होतील.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement