SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चेन्नई सुपर किंग्ज यंदाच बदलणार आपला कॅप्टन..? धोनीऐवजी हा खेळाडू होणार कॅप्टन..?

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी नि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील नातं अगदी सुरुवातीपासूनचं.. ‘आयपीएल’ खेळण्याची सुरुवातच धोनीने ‘सीएसके’सोबत केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 2010, 2011, 2018 नि 2021, असे चार वेळा विजेतेपद पटकावले आहे..

मधल्या काळात चेन्नई सुपर किंग्जवर दोन वर्षांसाठी कारवाई करण्यात आली होती. या काळातच धोनी इतर संघांकडून खेळला, नाहीतर त्याची अख्खी आयपीएल कारकिर्द ‘सीएसके’सोबत झाली आहे. अगदी सुरुवातीपासून तो चेन्नईचा कॅप्टन असून, अगदी गेल्यावर्षीही त्याच्या नेतृत्वाखाली टीमने विजेतेपद मिळवले होते..

Advertisement

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून धोनी आता फक्त ‘आयपीएल’च खेळतो. मात्र, यंदाची त्याची अखेरची ‘आयपीएल’ स्पर्धा असेल, असे बोलले जात आहे. खुद्द धोनीनेही चेन्नईत अखेरची मॅच खेळून ‘आयपीएल’सह क्रिकेटला ‘गुड बाय’ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते.

Advertisement

आगामी ‘आयपीएल’ (IPL 2022) स्पर्धेची तयारी आता सुरू झालीय. पुढील महिन्यात ‘मेगा ऑक्शन’ होणार असून, त्यानंतर सगळ्या टीमचे चित्र स्पष्ट होईल. सध्या सर्व टीम ‘ऑक्शन’च्या तयारीला लागल्या आहेत. ‘सीएसके’ने यंदा धोनीला रिटेन केले, मात्र खुद्द धोनीने मानाचे पान आपला सहकारी व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याला दिले.

रिटेनमध्ये धोनीने दुसरे स्थान स्वीकारताना, जाडेजाला पहिल्या स्थानी बसविले. मात्र, कॅप्टन म्हणून धोनीच राहणार असल्याचा अंदाज आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, या सिझनमध्ये ‘सीएसके’चा कॅप्टन बदलला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

हा खेळाडू होणार कॅप्टन..
रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याला या सिझनमध्येच ‘सीएसके’चा कॅप्टन केला जाण्याची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षांपासून तो ‘सीएसके’ टीमचा सदस्य आहे. ‘सीएसके’ला दोन वेळा ‘आयपीएल’ जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

यंदा ‘आयपीएल’चा संपूर्ण सिझन धोनी खेळणार की चेन्नईत एक-दोन सामने खेळून निवृत्त होणार, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, पुढील 10 वर्षांचा विचार करुन टीम तयार करावी लागणार असल्याचे धोनीने म्हटले होते. त्यामुळे ‘सीएसके’ मॅनेजमेंट याच सिझनमध्ये धोनीच्या उपस्थितीत जाडेजाला कॅप्टन करू शकते, अशी चर्चा आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement