देशसेवेची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. सीमा सुरक्षा दलात (Border Security Force Recruitment) तब्बल 2788 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून, ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
‘बीएसएफ’मध्ये कोणत्या पदासाठी ही नोकर भरती होतेय, त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करावा लागेल, कुठे नि कसा अर्ज करायचा, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
एकूण जागा – 2788
या पदासाठी भरती – कान्स्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman)
शैक्षणिक पात्रता नि अनुभव
– उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण झालेला असावा.
– उमेदवार एक ते दोन वर्षांचा संबंधित ट्रेडमधील अनुभव आवश्यक किंवा उमेदवारांनी संबंधिता ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) पूर्ण केलेलं असावं
– निवडीसाठीच्या सर्व अटी-शर्थी आणि पात्रता पूर्ण करणं आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता
उंची : पुरुष- 167.5 सेमी, महिला- 157 सेमी.
छाती (केवळ पुरुषांसाठी) – 78 – 83 सेमी.
अनुसूचित जाती/जमाती/आदिवासी
उंची : पुरुष- 162.5 सेमी, महिला- 155 सेमी.
छाती (केवळ पुरुषांसाठी) – 76-81 सेमी.
डोंगराळ भागातील उमेदवार
उंची : पुरुष- 165 सेमी, महिला- 150 सेमी.
छाती (केवळ पुरुषांसाठी) : 78-83 सेमी
वयोमर्यादा – उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्षे असावं.
पगार – 21,700 ते 69,100/- रुपये प्रति महिना
भरती शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी – 100/- रुपये
राखीव प्रवर्ग – निःशुल्क
आवश्यक कागदपत्रे
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईज फोटो
अर्जासाठी अंतिम तारीख – 28 फेब्रुवारी 2022
इथे करा अर्ज – http://www.bsf.nic.in/
मूळ जाहीरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा