SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एमपीएससी’द्वारे अधिकारी होण्याची संधी, तब्बल 547 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, लगेच करा अर्ज..!

कायद्यामध्ये पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी नोकरीत अधिकारी होण्याची संधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल 547 विविध पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरु आहे.

‘एमपीएससी’ (MPSC)मार्फत विविध रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे. सहायक लोक अभियोजक, गट ‘अ’ पदांसाठी ही भरती सुरु असून, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. भरती प्रक्रिया 7 जानेवारी 2022 पासून सुरु झाली असून, 27 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Advertisement

एकूण पदसंख्या – 547

या पदासाठी भरती
सहाय्यक लोक अभियोजक
गट ‘अ’ मधील पदांसाठी भरती

Advertisement

भरतीसाठी अटी
– कायद्यामध्ये पदवी घेतलेले उमेदवार भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
– या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट.
– व्यक्तिगत मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्जासाठी शुल्क
– खुल्या उमेदवारांसाठी – 719 रुपये
– राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 449 रुपये

Advertisement

कुठे करणार अर्ज..? – mpsc.gov.in

अर्ज कसा करावा ?
– ‘एमपीएससी’च्या अधिकृत संकेतस्थळावर mpsc.gov.in वर जा.
– स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.
– विनंती केलेली माहिती भरा व अर्ज भरा.
– अर्ज शुल्क भरुन त्याची एक प्रत डाउनलोड करा.

Advertisement

राज्य सेवा पूर्व परीक्षेबाबत..
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा 23 जानेवारी 2022 रोजी होणार असून, या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयाेगाने दिली आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement