SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वन प्लसचे दोन दमदार स्मार्टफोन भारतात लाॅंच होणार, वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी वाचा..

वन प्लस या चिनी कंपनीचे मोबाईल दमदार फिचर्ससाठी ओळखले जातात. त्यांच्या अनेक स्मार्टफोनला ग्राहकांची चांगली मागणी असते. भारतातील मोठी बाजारपेठ लक्षात घेऊन या कंपनीने अनेक स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले आहेत.. विशेष म्हणजे, त्यांना चांगली मागणी असल्याचे पाहायला मिळते..

‘वन प्लस’ मोबाईल कंपनीकडून भारतीय बाजारपेठेत आज (ता. 14) दोन नवे दमदार स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. ‘वन प्लस-9 आरटी विंटर एडिशन’ (OnePlus 9RT Winter Editions) व ‘वन प्लस बड्स झेड-2’ (Oneplus Buds Z2), अशी या स्मार्टफोनची नावे आहेत.

Advertisement

‘वन प्लस’च्या या स्मार्टफोनची तुलना आतापासून थेट ‘व्हिवो एक्स 70’ (Vivo X70) या मोबाईलसोबत केली जात आहे. ‘वन प्लस-9 आर’ या स्मार्टफोनचे अपग्रेडेड व्हर्जन आहे, तर दुसरीकडे ‘बड्स झेड 2’ हा नवा मोबाईल ‘वन प्लस बड्स झेड’ या जुन्या सिरीजचे अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे. या दोन्ही मोबाईलची वैशिष्ट्ये सविस्तर जाणून घेऊ या..

‘वन प्लस-9 आरटी (OnePlus 9RT)
डिसप्ले – हा स्मार्टफोन याआधीच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. मोबाईलचा डिसप्ले 6.7 इंच अमोल्ड असून, स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120hz असेल.
कॅमेरा – या मोबाईलमध्ये ट्रिपल कॅमेरा असेल. प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल, 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगलचा दुसरा कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा, तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

Advertisement

बॅटरी – मोबाईलमध्ये 4500mAh ची बॅटरी असेल, चार्जिंगसाठी 65W चा चार्जिंग सपोर्ट मिळेल.

किंमत – वेबसाईटवर सांगितल्याप्रमाणे या फोनची किंमत 42999 रुपये असेल. फोनमध्ये 8 जीबी रॅम, 128 जीबी इंटर्नल स्टोअरेज मिळेल. 46999 रुपयांत हाच मोबाईल 12 जीबी रॅम, 256 जीबी इंटरनल स्टोअरेजसह खरेदी करता येईल.

Advertisement

वन प्लस बड्स झेड 2 (OnePlus Buds Z2)
या नव्या मोबाईलमध्ये ’11 एमएम डायनामिक ड्रायव्हर’ मिळण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये एएनसी (अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन), तसेच ट्रिपल मायक्रोफोन असा सेटअप मिळू शकतो. मोबाईलला ब्लुटूथ 5.2 कनेक्टीव्हीटी असेल.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement