SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वजन वाढण्याची भीती सोडा, गावरान तूप खा…? गावरान तुपाचे हे फायदे पाहून तोंडात बोटे घालाल…

‘जो खाईल तूप, त्याला येईल रुप..’ असे घरातील वडिलधारी मंडळी नेहमीच म्हणत असतात. मात्र, जादा तूप खाल्ल्यास शरीरातील चरबी वाढून वजन वाढेल, लठ्ठपणा येईल नि शरीराचा आकार बिघडेल, अशी एक अनामिक भीती असते. तुमच्याही मनात असाच काही गैरसमज असेल, तर तो लगचे काढून टाका..

जेवणात तूपाचा समावेश असायलाच हवा, हा वडिलधाऱ्याचा सल्ला अनाठायी नव्हता.. त्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत. मात्र, या कारणांचा आपण कधी शोध घेण्याचाही प्रयत्न केला नाही. फिटनेसबाबत अधिक जागृक असणारे लोक गावरान तुपाचा (Desi Ghee) वापर आहारात करीत नाहीत.

Advertisement

मात्र, गावरान तूप खाल्ल्याने वजन किंवा चरबी वाढत नाही. ऊलट गावरान तूप खाल्ल्यास शरीराला फायदेच अधिक होतात.. आयुर्वेदामध्येही गावरान तुपाला एक औषध म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, वजन वाढण्याच्या भीतीने लोक गावरान तुपाऐवजी आहारात रिफाईंड तेल वापरतात. मात्र, ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

गावरान तुपामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला मजबुती येते. आरोग्यासाठी गावरान तुपाचे काय फायदे होतात, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

गावरान तूप खाण्याचे फायदे

कोलेस्ट्रॉल वाढीसाठी उपयुक्त
कोलेस्ट्रॉलची समस्या असणाऱ्या लोकांना गावरान तुपापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, मात्र आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक चांगले नि एक वाईट कोलेस्ट्रॉल. तूपात चांगले कोलेस्ट्रॉल असते, जे शरीराला आतून मजबूत व सुदृढ बनविते. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करते.

Advertisement

पचनशक्ती सुधारते
देशी तूपामध्ये फॅटची मात्रा खूपच कमी असते. शिवाय तुपामुळे पचनशक्तीसुद्धा सुधारते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, अशा लाेकांनी आहारात देशी तुपाचा समावेश केला, तर पोट वेळेवर साफ होते.

चेहऱ्यावर ग्लो येतो
गावरान तुपाच्या नियमित सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येतो. तुम्ही रात्री झोपन्यापूर्वी चेहऱ्यावर गावरान तूप लावून झोपल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. तुपामध्ये अशी अनेक पोषक तत्वे असतात, त्याचा शरीराला मोठा फायदा होतो.

Advertisement

तूपात भरपूर ‘अॅंटी ऑक्सीडेंट’ गुणधर्म असतात, त्यामुळे चेहऱ्यावरील विषारी घटक निघून जातात, तसेच चेहऱ्यावरील मृतपेशी असतील, तर नियमितपणे तूप सेवन केल्याने मृतपेशी निघून जातात. त्वचा नैसर्गिकरित्या चमकते. चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, पिंपल्स दूर होतात.

शरीराला व्हिटामिन्स मिळतात
तुपातील फॅटमुळे शरीराला मोठा फायदा मिळतो. शरीर तंदुरुस्त व मजबूत बनते. शरीरातील स्नायू व पेशींची वाढ होते. शरीरातील व्हिटामिन्स भरून काढण्याची क्षमता तुपात असते. नियमित तूप खाल्ल्याने ‘व्हिटामिन ‘ए’ ची कमतरता भरून निघते.

Advertisement

तुपाचे प्रमाण
कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त केली, तर ती आपल्यासाठी विपरीत ठरू शकते. तसेच तुपाचे आहे. त्यामुळे एका मर्यादेतच तुपाचे सेवन करायला हवे. मर्यादेपेक्षा जास्त तुपाचेही सेवन केले, तर त्याचा विपरित परिणाम शरीरावर होऊ शकतो. हृदयाबाबत वा अन्य आजार असणाऱ्या व्यक्तींनी आहारतज्ज्ञ व डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात तूपाचा समावेश करावा.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement