भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन येथे मालिकेतील तिसरा व अखेरचा कसोटी सामना खेळविला जात आहे. भारताने पहिल्या डावात 223 धावा केल्यावर आफ्रिकेचा डाव 210 धावांत गुंडाळला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात ऋषभ पंत याच्या शतकाच्या जोरावर भारताने 198 धावा केल्या.
भारताच्या पहिल्या डावातील आघाडीसह दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे आव्हान देण्यात आले. त्यानंतर आफ्रिकेने दुसऱ्या डावात शानदार सुरुवात केली असून, 2 विकेटवर 101 धावा केल्या आहेत. आता ही कसोटी व मालिका जिंकण्यासाठी आफ्रिकेला 111 धावांची, तर भारताला 8 विकेटची गरज आहे.
दरम्यान, आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मैदानावर चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याच्या ‘एलबीडब्ल्यू’वरून हा वाद झाला. 21 व्या ओव्हरला अश्विनने टाकलेला चौथा बॉल एल्गरच्या पॅडला लागला. भारताने पायचितचे अपील केलं असता, अंपायर मरेस इरासमस यांनी एल्गरला आऊट दिलं. एल्गरने ‘डीआरएस’चा निर्णय घेतला.
Dean Elgar survives 🤏
AdvertisementInitially given out, he reviewed it, and the decision was overturned. Big moment in the match and the series👀
📺 Stream #SAvIND live: https://t.co/0BMWdennut pic.twitter.com/6EJmtd0Qy3
Advertisement— SuperSport 🏆 (@SuperSportTV) January 13, 2022
‘डीआरएस’ घेतल्यानंतर मैदानातील मोठ्या स्क्रीनवर जे दिसले, ते पाहून टीम इंडियाच नव्हे, अंपायरला आश्चर्याचा धक्का बसला. कॅप्टन विराट कोहलीची तर एकदम सटकली. रागाच्या भरात तो भलतंच काहीतरी बोलून गेला नि आता तो अडचणीत सापडला आहे. ‘आयसीसी’कडून त्याच्यावर कारवाई केली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
विराट काय म्हणाला?
विराट कोहली स्टम्पजवळ असताना म्हणाला, की “फक्त विरोधी टीमवरच नाही, तर तुमच्या संघावरही लक्ष द्या. नेहमी लोकांना पकडण्याचा प्रयत्न करीत असता. संपूर्ण देशच आमच्याविरुद्ध खेळत आहे.” त्याच वेळी के. एल. राहुल यानेही काहीतरी वक्तव्य केलं..
अश्विनने निशाणा साधला..
या मालिकेचे प्रसारण करणाऱ्या सुपर स्पोर्टस चॅनेलवरच अश्विनने निशाणा साधला. “जिंकण्यासाठी चांगला मार्ग शोधा, सुपरस्पोर्ट..” असे तो म्हणाला. सामन्याचे प्रक्षेपण करणारे या ‘बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजी’ची व्यवस्था करतात. दक्षिण आफ्रिकेत सामन्याचे प्रक्षेपण सुपर स्पोर्टस करीत आहे. त्यांनी काही तरी फेरफार केल्याचा अश्विनचा दावा हाेता.
अखेर भारताला एल्गरची विकेट घेण्यात यश आले. बुमराहने त्याला 30 धावांवर आऊट केले. बुमराहच्या बाॅलिंगवर ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. यावेळी अंपायरनी एल्गरला आऊट दिलं नाही. अखेर विराटने ‘डीआरएस’ घेतला. त्यात एल्गरच्या बॅटला बॉल लागल्याचे समोर आलं नि टीम इंडियाने जल्लोष केला.