SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : कामाचा आवाका लक्षात घ्यावा. काटकसरीचा मार्ग अवलंबाल. उगाच दिखाऊपणा करायला जाऊ नका..

वृषभ (Taurus) : सगळ्या गोष्टीत तत्परता दाखवाल. आपल्या भावना उत्तम प्रकारे मांडाल. हसत-हसत कामे साध्य करून घ्याल.

मिथुन (Gemini) : काही गोष्टी मनाशी पक्क्या कराव्या लागतील. कामातील उत्साहाला चिकाटीची जोड द्यावी.

कर्क (Cancer) : कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करता येतील. नातेवाईकांचा विरोध सहन करावा लागेल. खर्चाचे गणित सांभाळावे लागेल.

सिंह (Leo) : कामाचा विस्तार वाढवावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.

कन्या (Virgo) : अपयशाला घाबरू नका. घरातील परिस्थिती लक्षात घ्यावी. घरगुती खर्चाचा अंदाज घ्यावा..

तूळ (Libra) : कामातील चिकाटी वाढवावी लागेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. भागीदाराशी मतभेद संभवतात.

वृश्चिक (Scorpio) : उष्णतेचे विकार वाढू शकतात. पत्नीच्या सुस्वभावीपणाची चुणूक दिसून येईल. कामातील व्यावहारिक बाजू जाणून घ्या.

धनु (Sagittarius) : काही गोष्टी मनाविरुद्ध मान्य कराव्या लागतील. वडीलधार्‍या व्यक्तींचे विचार विरोधी भासतील..

मकर (Capricorn) : सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. प्रयत्नवादी राहावे लागेल.

कुंभ (Aquarius) : पैसे कमवाल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्याल..

मीन (Pisces) : वेगवेगळे खेळ खेळू वाटतील. अभ्यासू लोकांच्यात वावराल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

Advertisement