SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 20 हजारांत सुरु करा व्यवसाय, 4 लाखांपर्यंत कमाईची संधी..

नोकरीऐवजी स्वत:चा व्यवसाय सुरु करायचाय, पण भांडवलाची अडचण असल्यास तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अगदी 20 हजार रुपयांत तुम्हाला व्यवसाय सुरु करता येईल. शिवाय त्यातून उत्पन्नही मोठ्या प्रमाणात हाती पडणार आहे.

‘मन की बात’ कार्यक्रमात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही या व्यवसायाचा उल्लेख केला होता. हा व्यवसाय म्हणजे, लेमन ग्रास फार्मिंग (Lemon Grass Farming).. अर्थात गवती चहाची शेती… या शेतीमुळे शेतकरी स्वत: सक्षम होत असून, देशाच्या प्रगतीतही योगदान देत असल्याचे पीएम मोदी म्हणाले होते.

Advertisement

कशी करणार लागवड..?
गवती चहाच्या लागवडीसाठी फेब्रुवारी ते जुलैदरम्यानच्या काळ सर्वोत्तम समजला जातो. गवती चहाची एकदा लागवड केली, की वर्षातून 3 ते 4 वेळा त्याची कापणी केली जाते. लागवडीनंतर 3 ते 5 महिन्यांनी पहिली कापणी केली जाते. त्याला बाजारात मोठी मागणी असून, या शेतीतून केवळ एका हेक्टरमधून वर्षाला सुमारे 4 लाख रुपयांपर्यंत नफा कमवू शकता.

गवती चहापासून तेल काढलं जाते. या तेलाला मोठी मागणी आहे. सौंदर्य प्रसाधने, साबण, तेल आणि औषधे बनवणाऱ्या कंपन्या हे तेल वापरतात. त्यामुळे त्याला बाजारातही चांगला भाव मिळत असून, त्याच्या विक्रीचा दर 1,000 ते 1,500 रुपये लिटर आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, ही वनस्पती दुष्काळग्रस्त भागातही लावता येते. त्याला ना खताची गरज आहे, ना वन्य प्राण्यांची भीती. त्यामुळे हे पीक फायदेशीर ठरते. एकदा त्याची लागवड केली केली, की 5 ते 6 वर्षे त्यापासून उत्पादन घेता येते. त्यामुळे सुरुवातीलाच खर्च करावा लागतो.

कापणी कधी करायची..?
गवती चहा कापण्यासाठी तयार आहे की नाही, हे समजण्यासाठी त्याचे पान तोडून वास घ्या. लिंबासारखा तीव्र वास आला, तर गवती चहा कापणीसाठी तयार असल्याचे समजा. जमिनीपासून 5 ते 8 इंचावर त्याची कापणी करावी. त्याची उत्पादन क्षमता तीन वर्षांपर्यंत चांगली राहते. मार्च-एप्रिल महिन्यात गवती चहाची रोपवाटिका तयार करता येते..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement