नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अगदी दहावी पास उमेदवारांनाही चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन’ (BRO recruitment) अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरु असून, तब्बल 354 जागांसाठी ही पदभरती केली जाणार आहे.
या नोकर भरतीसाठी पात्रता काय आहे, कोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे, त्यासाठी अर्ज कसा, कुठे व कधीपर्यंत करायचा, अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..!
एकूण जागा – 354
पदनिहाय एकूण जागा
मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर – 33
मॅकेनिक – 293
ड्रायव्हर मॅकेनिकल ट्रान्सपोर्ट – 16
मेस वेटर – 12
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा
मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर – 18 ते 25 वर्षे
मॅकेनिक व ड्रायव्हर मॅकेनिकल ट्रान्सपोर्ट – 18 ते 27 वर्षे
अर्ज शुल्क – 50 रुपये
वेतन
मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर – 18000 ते 56900 रुपये
मॅकेनिक – 18000 ते 56900 रुपये
ड्रायव्हर मॅकेनिकल ट्रान्सपोर्ट – 19900 ते 63200 रुपये
मेस वेटर – 19900 ते 63200 रुपये
कधीपर्यंत अर्ज करता येणार – 17 जानेवारी 2022
इथे करा अर्ज – http://bro.gov.in/
मूळ जाहीरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1tIzHpOs9Ylu4KqG9nfjnpvCNDOtVeieR/view