SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गॅस सबसिडी तुमच्या बॅंक खात्यावर जमा झाली का..? असे करा चेक, नसल्यास तक्रारही करता येणार..!..

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी गॅस सबसिडी मोदी सरकारने दोन वर्षांपूर्वी अचानक बंद केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी सबसिडी सुरु केल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, अनेक कुटुंबांना ही सबसिडी आपल्या बँक खात्यावर जमा होते की नाही, याबाबत काहीच माहिती नाही.

सध्या सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीसह गॅसच्या किंमती गगणाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात गॅस सबसिडी बंद झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत होता. मात्र, गॅस ग्राहकांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे.

Advertisement

नागरिकांच्या खात्यावर गॅस सबसिडीची रक्कम वर्ग करण्यात येत आहे. मात्र, खात्यावर सबसिडीचे पैसे जमा होत नसल्यास नागरिकांना टोल फ्री क्रमांकावरुन तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 18002333555 हा टोल फ्री नंबर जारी केला आहे. गॅस सबसिडी संबंधित इतर तक्रारीही या नंबरवर करता येणार आहेत. मात्र, तक्रार करण्याआधी खात्यावर पैसे जमा झाले की नाही, याची माहिती घ्यायला विसरु नका.

गॅस सबसिडी अशी चेक करा..
– सर्वप्रथम http://mylpg.in/ या वेबसाईटवर जा.
– तेथे तुमचा 17 अंकी ‘एलपीजी आयडी’ (LPG ID) टाकून रजिस्टर्ड मोबाईल नंबर भरावा..
– कॅप्चा कोड टाकून पुढे सुरु ठेवा.

Advertisement

– नंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
– पुढील पेजवर तुमचा ई-मेल आयडी व पासवर्ड जेनरेट करा.
– ई-मेलवर एक अ‍ॅक्टीवेशन लिंक येईल, त्यावर क्लिक करा.

– लिंकवर क्लिक करताच तुमचे अकॉउंट अ‍ॅक्टिव्हेट होईल.
– त्यानंतर तुम्ही mylpg.in वर जाऊन लॉग-इन करा.
– तुमचे आधार कार्ड ‘एलपीजी’ खात्याशी लिंक असल्यास त्यावर क्लिक करा.
– तेथे View Cylinder Booking History/subsidy transferred पर्याय पाहा.
– इथे तुम्हाला ‘एलपीजी गॅस सिलिंडर’च्या सबसिडीची माहिती मिळेल.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement