SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विराट कोहलीच्या विकेटवरुन राडा.. अख्ख्या आफ्रिका संघाला एकटा विराट भिडला..!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी व निर्णायक टेस्ट सध्या केपटाऊनमध्ये सुरु आहे. टेस्टच्या पहिल्या दिवशी कॅप्टन विराट कोहली व चेतेश्वर पुजारा सोडता टीम इंडियाचे फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. त्यामुळे भारताचा पहिला डाव अवघ्या 223 धावांवर संपुष्टात आला.

टेस्टच्या पहिल्या दिवशी खरं तर विराट कोहली विरुद्ध दक्षिण आफ्रिका असाच सामना रंगल्याचे दृश्य होते.आफ्रिकेच्या वेगवान बॉलर्सनी विराटची चांगलीच परीक्षा घेतली. मात्र, विराटनेही शिस्तबद्ध खेळी करताना 201 बाॅलचा सामना करीत कठीण खेळपट्टीवर 79 धावांची झुंजार खेळी केली.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून खराब फाॅर्ममधून जाणाऱ्या विराटवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. मात्र, त्याने सर्वच टीकाकारांना आपल्या बॅटने उत्तर दिले. त्याच्या खेळामुळेच टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.

Advertisement

एकटाच आफ्रिका संघाला भिडला
दरम्यान, या टेस्टमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यात विराट एकटाच दक्षिण आफ्रिकेच्या सर्व खेळाडूंसमोर उभा असल्याचे दिसते.

विराट कोहली 40 धावांवर खेळत असताना, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी तो झेलबाद असल्याचे जोरदार अपील केले, पण पंचांनी ते फेटाळून लावले. त्यावर आफ्रिकेच्या डिन एल्गर याने ‘डीआरएस’ घेतला. मात्र, त्यातही विराटच्या बॅटला कुठेही चेंडू लागला नसल्याचे दिसले.

Advertisement

तिसरे पंच ‘डीआरएस’बाबत निर्णय घेत असताना, मैदानावर एका बाजूला विराट, तर समोर आफ्रिकेचा संपूर्ण संघ, असा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आफ्रिकेचे खेळाडू व विराट या वेळी एकमेकांशी बोलतानाही दिसले. अर्थात, त्यावेळी खेळीमेळीचे वातावरण असल्याचे दिसून येत होते.

Advertisement

द्रविडचा विक्रम मोडला..
दक्षिण आफ्रिकेत कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट (624*)आता दुसऱ्या स्थानी आला आहे.. सचिन तेंडुलकर 1161 धावांसह अव्वल स्थानावर, तर त्यानंतर राहुल द्रविड 624, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (566) व सौरव गांगुली (506) यांचा क्रमांक येतो.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement