SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमचं मूल उशिरापर्यंत झोपतं का..? त्याच्या आरोग्यावर होऊ शकतो हा गंभीर परिणाम..

‘लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे..’ असे आपल्याकडे म्हटलं जातं. पिढ्या-न्-पिढ्या आपण ही गोष्ट ऐकत आलोय. मात्र, आता त्यावर विज्ञानानेही शिक्कामोर्तब केलंय. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे, आरोग्यासाठी चांगले असल्याचे एका अभ्यासातूनही समोर आलेय.

मूल जन्माला आल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत ते कित्येक तास झोपतं. झोपेतच त्याची वाढ होत असते. मात्र, मूल जसजसे मोठे होते, तसतशी त्याची झोप कमी होते. आता तर पालकांबरोबर मुलेही उशिरापर्यंत जागरण करतात. मग सकाळी उशिरा उठतात. मात्र, मुलांच्या आरोग्यासाठी ही सवय फार घातक ठरु शकते..

Advertisement

संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर..
अमेरिकेच्या ब्रिंघॅम यंग युनिव्हर्सिटीमध्ये (Brigham Young University) 14 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या झोपण्याच्या सवयीबाबत अभ्यास करण्यात आला. त्यातून सकाळी उशिरापर्यंत झोपणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलांमध्ये मधुमेहासह (डायबेटिस) आरोग्याच्या अन्य समस्यांही निर्माण होण्याची शक्यता असल्याचे समोर आलेय.

हा अभ्यास करताना, संशोधकांनी मुलांना एक आठवडा रात्री साडेसहा तास, तर पुढच्या आठवड्यात साडेनऊ तास झोपायला सांगितले. दोन्ही वेळा त्यांना सारख्याच प्रमाणात कॅलरीज असणारे अन्न दिले. त्यात फळं नि भाज्या कमी नि रक्तातील शुगर वाढविणारे अन्नपदार्थ खाण्यास सांगण्यात आले.

Advertisement

थकलेल्या मुलांनी सरासरी 12 ग्रॅम साखर खाल्ली. आता वर्षभराचा विचार केल्यास, मुलांच्या शरीरात अडीच ते तीन किलो साखर गेली. म्हणजेच रोज तीन चमचे साखर… हे संशोधन ‘स्लीप’ (Sleep) जर्नलमध्ये प्रकाशित झालंय. तसेच रात्री 9 ते 11 तास झोप घेणाऱ्या मुलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढल्याचे ‘ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन’ (AASM)च्या अभ्यासातून समोर आलेय.

मुलांमध्ये वजनाची समस्या गंभीर..
हल्ली वाढत्या वयाच्या मुलांमध्ये वजनाची समस्या गंभीर होतेय. वाढत्या वजनामुळे लहान वयातच मुलांना हार्ट ॲटेक, स्ट्रोक, उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) आणि डायबेटिस यांसारख्या आजारांचा धोका वाढलाय. थकलेल्या मुलांना त्वरित एनर्जी हवी असते, त्यासाठी अनेकदा ‘अनहेल्दी’ पदार्थ खाण्यात येतात. त्यामुळे खाण्याबरोबरच झोपण्याच्या सवयीकडेही लक्ष द्यायला हवं.

Advertisement

मुलांचे वजन वाढू द्यायचे नसेल, तर त्यांनी आवश्यक तितकीच झोपायला हवं. शिवाय सकाळच्या खाण्यात ‘प्रोटिन’ जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा, असं या अभ्यासाचे प्रमुख डॉ. कारा ड्युरासियो यांचे म्हणणं आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement