SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

करदात्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.. असा होणार फायदा..

देशभरातील करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही अजूनही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरलेला नसेल, तर काळजी करु नका.. मोदी सरकारने पुन्हा एकदा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता 15 मार्चपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे.

आयकर रिटर्न भरण्यासाठी या आधीही दोन वेळा मुदत वाढविण्यात आली होती. सुरुवातीला 31 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाच्या ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतो आहे..

Advertisement

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आयकर रिटर्न भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाणार असल्याचे आयकर अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते. त्यानुसार, आता मुदतवाढ देण्यात आल्याने करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे मुदतवाढ
2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्यासाठी 15 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) यांच्याकडून देण्यात आली. कोरोना महामारीमुळे करदात्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आयकर रिटर्न भरण्याची तारीख पुन्हा वाढवण्यात आल्याचे ‘सीबीडीटी’कडून सांगण्यात आले.

Advertisement

प्राप्तिकर कायदा-1961 च्या तरतुदींनुसार विविध लेखापरीक्षण अहवालांच्या ई-फायलिंग दरम्यान येणाऱ्या समस्यांमुळे ही मुदतवाढ देण्यात आल्याचे ‘सीबीडीटी’ने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

रिटर्न न भरल्यास..
प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 19 डिसेंबरपर्यंत 3.83 कोटींहून अधिक करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत. आता रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने त्यात वाढ होऊ शकते. मात्र, या मुदतीत रिटर्न न भरल्यास दंडासह आयटीआर (ITR) भरावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement