SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दुसरी लाट ओसरणार का? राज्यातील रुग्णवाढीला ब्रेक, वाचा संपूर्ण आकडेवारी…

देशासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत असताना कोरोना प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध राज्य शासनाने लागू केल्यानंतर आता रुग्ण संख्येचा आलेख देखील उतरणीला लागल्याचं पाहायला मिळतंय. त्यानुसार काल (ता.10 जाने.) दिवसभरात 33 हजार 470 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांनी 40 हजारांचा टप्पा पार गाठला होता.

राज्यात आता मुंबईत सर्वाधिक 13 हजार 648 रुग्ण आहेत. त्या खालोखाल ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रुग्णसंख्या आहे. रविवारी (9 जाने.) राज्यात सुमारे 44 हजार रुग्ण आढळून आले होते, तर काल जवळजवळ दहा हजाराने रुग्ण संख्या घटली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 29 हजार 671 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 94.95 टक्के इतका आहे. काल दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 2.3 टक्के इतका झाला आहे.

Advertisement

राज्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार, काल अखेरीस 31 ओमायक्रॉन बाधित (Omicron) रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक 28 रुग्ण पुणे मनपा, पुणे ग्रामीण 2 आणि पिंपरी चिंचवड मध्ये 1 रुग्ण बाधित आढळून आला, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. काल राज्यात ओमायक्रॉन बाधित रुग्ण सुद्धा कमी झाल्याचं दिसलं. तर मुंबईत काल एकही ओमायक्रॉन बाधित (Omicron Patients) रुग्ण सापडला नाही.

राज्यात सध्या 12 लाख 46 हजार 729 व्यक्ती होम क्वारंटाइन (home quarantine) तर 2505 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine)आहेत. 2 लाख 06 हजार 046 कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) रुग्ण आहेत. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजवर 7 कोटी 07 लाख 18 हजार 911 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 09.83 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

Advertisement

कोणत्या विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण..?

▪️ मुंबई महापालिका – 13648
▪️ पुणे पालिका – 3098
▪️ ठाणे मनपा – 2423
▪️ नवी मुंबई पालिका – 2020
▪️ पिंपरी चिंचवड पालिका – 1246
▪️ कल्याण डोबिवली पालिका – 1192
▪️ नागपूर मनपा – 863
▪️ पुणे – 812
▪️ ठाणे – 702
▪️ नाशिक पालिका – 649
▪️ वसई विरार पालिका – 478
▪️ सातारा – 356
▪️ नाशिक – 348
▪️ अहमदनगर – 144
▪️ अहमदनगर पालिका – 91

Advertisement

ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण कुठे?

▪️ मुंबई – 606
▪️ पुणे मनपा – 251
▪️ पिंपरी चिंचवड – 61
▪️ सांगली – 59
▪️ नागपूर – 51
▪️ ठाणे मनपा – 48
▪️ पुणे ग्रामीण – 32
▪️ कोल्हापूर – 18
▪️ पनवेल – 17
▪️ उस्मानाबाद – 11
▪️ नवी मुंबई, सातारा – 10
▪️ अमरावती – 9
▪️ कल्याण डोंबिवली – 7
▪️ बुलढाणा, वसई – विरार – 6
▪️ भिवंडी मनपा, अकोला- 5
▪️ नांदेड, औरंगाबाद, उल्हासनगर, मीरा भाईंदर आणि गोंदिया – 3 प्रत्येकी
▪️ गडचिरोली, अहमदनगर, लातूर आणि नंदुरबार – 2 प्रत्येकी
▪️ जालना आणि रायगड – प्रत्येकी 1
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement