SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वोडाफोन-आयडियाची मालकी भारत सरकारकडे जाणार? वाचा काय आहे नेमकं प्लॅन…

देशातील दिग्गज कंपनी वोडाफोन-आयडियाने दिलेल्या माहीतीनुसार, त्यांच्या बोर्डाने संपूर्ण स्पेक्ट्रम-संबंधित व्याज रकमेच्या रूपांतरास मान्यता दिलीय. तसेच कंपनी थकबाकी भरण्यासाठी इक्विटीमध्ये एअरवेव्हचा वापर करण्यासाठी तयारी करेल.

Vodafone Idea ने एका निवेदनात म्हटलंय की, रूपांतरण झाल्यानंतर, कंपनीच्या एकूण थकबाकीपैकी तब्बल 35.8% समभाग (Shares) भारत सरकारकडे असणार आहेत, म्हणजेच भारत सरकारचा मालकी हक्क कंपनीत वाढणार आहे. प्रमोटर शेअरहोल्डर व्होडाफोन ग्रुप 28.5% आणि आदित्य बिर्ला 17.8% शेअर्स असतील.

Advertisement

या अहवालानुसार, या कंपन्यांचा समायोजित सकल महसूल (एजीआर) चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 17.07 टक्क्यांनी वाढून 53,510 कोटी रुपये झाला आहे, जो जुलै-सप्टेंबर 2020 मधील 45,707 कोटी रुपये होता, अशी माहीती आहे.

भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांचा एकूण महसुलात 78 टक्के आणि एजीआरच्या महसुलात 79 टक्के वाटा असल्याचं समजतंय.

Advertisement

भारतातील रिलायन्स जिओने (Reliance jio) त्या कालावधीत सर्वाधिक 18,467.47 कोटी रुपये एजीआर कमावले, त्यानंतर भारती एअरटेलने 14,730.85 कोटी रुपये आणि व्होडाफोन आयडियाने 6,337.58 कोटी रुपयांची कमाई केली. मग त्यानंतर बीएसएनएल (रु. 1,934.73 कोटी), टाटा टेलिसर्व्हिसेस (रु. 554.33 कोटी), MTNL (रु. 331.56 कोटी) आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स (रु. 53.4 कोटी) होते.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement