SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

असे लग्न करणाऱ्या जोडप्यास मिळणार अडीच लाख रुपये, केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना..!

समाजातील जातीभेद मिटावा, असमानतेची दरी दूर व्हावी. हा सगळा समाज एकसंध व्हावा, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत असते. समाज प्रगल्भ होत असला, तरी काही लाेकांच्या डोक्यातून, मनातून ‘जात’ काही जात नाही. काही जण सतत दोन जातींमध्ये विष कालवण्याचे काम करीत असतात.

भारतीय समाजात खोलवर जातीयवादी व्यवस्था रुतली आहे. त्यामुळे भिन्न जातीच्या मुला-मुलींनी लग्न करणे म्हणजे आजही एखादा गुन्हा केल्यासारखेच समजले जाते. समाजात समानता यावी, यासाठी सरकारने आंतरजातीय विवाह योजना सुरु केली..

Advertisement

आंतरजातीय विवाहांकडे चुकीच्या नजरेतून पाहण्याऐवजी समाजहिताच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना केंद्र सरकारकडून 2.5 लाख रुपयांची मदत केली जाते.

केंद्राच्या या योजनेनुसार लग्नाचे कायदेशीर वय झाले असेल नि आंतरजातीय लग्न केल्यास ही आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो. त्यासाठी काय अटी आहेत, याबाबत जाणून घेऊ या…

Advertisement

योजनेसाठीच्या अटी
– ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन’च्या माध्यमातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जाेडप्यांना आर्थिक मदत म्हणून अडीच लाख रुपये दिले जातात.
– आंतरजातीय विवाह करणारे जोडपे (नवरा-नवरी) वेगवेगळ्या जातींची असावीत.

– या जोडप्याचा विवाह ‘हिंदू मॅरिज अॅक्ट-1995’नुसार रजिस्टर झालेले असावे. त्यासाठीचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते.
– या योजनेचा फायदा त्याच जोडप्याला मिळतो, जे पहिल्यांदा लग्न करतात. दुसऱ्या किंवा त्यापेक्षा अधिक वेळा लग्न करणाऱ्या जोडप्यास (एक जरी असला तरी) हा लाभ मिळत नाही.

Advertisement

– आंतरजातीय विवाह केल्यावर या जोडप्यांनी एक वर्षाच्या आत ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन’कडे अर्ज करावा. एक वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यास योजनेचा लाभ मिळत नाही.
– राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेतलेला असल्यास, केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement

 

Advertisement