SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

करदात्यांना होणार 5,000 रुपये दंड? आयटीआर भरण्याची आता ‘ही’ आहे शेवटची तारीख..

आर्थिक वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची 31 डिसेंबर 2021 ही अखेरची मुदत संपली आहे. तरी अद्यापही तुम्ही आयटीआर (ITR) भरला नसेल, तर तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत Belated ITR म्हणून तो दाखल करू शकता. मात्र जर करदात्यांनी 31 मार्च 2022 पर्यंत ITR दाखल केला नाही, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कर दायित्वाच्या कमीत कमी 50% इतका दंड भरण्यास सांगू शकते.

टॅक्स अँड इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर बळवंत जैन म्हणाले..

Advertisement

“आयटीआर न भरल्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करदात्यांवर खटला भरू शकतो. सध्याच्या आयकर कायद्यानुसार कमीत कमी 3 वर्षांचा तुरुंगवास आणि जास्तीत जास्त सात (7) वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. जर कर दायित्व 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट खटला सुरू करू शकतो.”

बळवंत जैन यांनी स्पष्ट म्हटले की, “जर करदात्याने देय तारखेपर्यंत म्हणजे 31 मार्च 2022 पर्यंत ITR भरला नाही, तर या परिस्थितीत, त्याने दायित्वापेक्षा जास्त टॅक्स जमा केला असला तरीही त्याला रिफंडवर व्याज मिळणार नाही. जर करदात्याने दायित्वापेक्षा कमी टॅक्स जमा केला असेल तर व्याज भरावे लागेल”, असं ते म्हणाले.

Advertisement

..तर होणार 5,000 रुपये दंड..?

आयकर कायद्याच्या कलम 139(1) अंतर्गत, कोणत्याही मूल्यांकन वर्षासाठी विहित मुदतीत प्राप्तीकर न भरल्यास 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना कलम 234F अंतर्गत 5 हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. या दंडासह 31 मार्च 2022 पर्यंत Belated ITR दाखल केले जाऊ शकते. यापूर्वी दंडाची रक्कम 10,000 रुपये होती, ती आता 5,000 रुपये करण्यात आली आहे.

Advertisement

जर करदात्याचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तर त्याला फक्त 1,000 रुपये दंड भरावा लागेल. आयकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न एकूण मूलभूत कपातीच्या मर्यादेपेक्षा कमी असेल (सवलत), तर त्याला ITR भरताना कोणताही दंड भरावा लागणार नाही. म्हणजेच, कोणत्याही कपातीचा दावा न करताही, एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, तर 31 मार्चपर्यंत तुम्हाला कोणताही दंड न भरता ITR फाइल करता येईल, अशी माहीती आहे.

विलंब शुल्क कोणाला..?

Advertisement

▪️ ज्या व्यक्तींच्या चालू खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी बँकेत आहेत.
▪️ परदेश दौऱ्यावर दोन लाख रुपयांपेक्षा अधिकचा खर्च करणाऱ्या व्यक्ती.
▪️कोणत्याही वर्षात एक लाख रुपयांपेक्षा अधिकचे वीजबिल भरणाऱ्या व्यक्ती.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement