SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलणार..! युनिफाॅर्ममध्ये आतापर्यंत किती वेळा झालाय बदल, जाणून घ्या..!

लष्कराचा युनिफाॅर्म घालून देशसेवा करायला मिळणं, हे कित्येक तरुणांचे स्वप्न असतं… मात्र, हा युनिफाॅर्म इतका सहज मिळत नाही. त्यासाठी प्रचंड कष्टाची तयारी ठेवावी लागते. लष्कराच्या गणवेशासोबत कोट्यवधी भारतीयांच्या भावना जोडलेल्या आहेत. या युनिफाॅर्मशी जोडली गेलीय एक शिस्त, सळसळता उत्साह नि निस्सीम त्याग..!

भारतीय लष्कराच्या याच युनिफाॅर्मबाबत एक मोठी बातमी समोर येतेय. लवकरच भारतीय जवानांचा गणवेश बदलला जाणार आहे. विविध भूप्रदेशांमध्ये तैनात असणाऱ्या सैनिकांना लक्षात घेऊन डिजिटल नमुन्यांवर आधारित डिझाइनमध्ये नवा गणवेश तयार केला आहे. या गणवेशामुळे जवानांनाही आरामदायी वाटेल, याची काळजी घेतली आहे.

Advertisement

‘मेक इन इंडिया’च्या अनुषंगाने भारतीय लष्कर व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) यांनी संयुक्तरित्या भारतीय जवानांच्या गणवेशाची निर्मिती केली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी, ‘आर्मी-डे परेड’ दरम्यान सैनिकांसाठी नवीन लढाऊ गणवेशाचा पहिला देखावा प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बाजारात मिळणार का..?
भारतीय जवानांच्या गणवेशासाठी डिझाइन केलेले कापड हे खुल्या बाजारात मिळणार नाही. अधिकारी नि सैनिकांना त्यांच्या युनिटमधील तुकड्यांमध्ये ते दिले जाणार आहे. तब्बल 13 लाख जवानांना हा गणवेश मिळणार असून, त्यासाठी कापड पुरवण्यासाठी खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना खुली निविदा जारी करण्याची सरकाराची योजना आहे.

Advertisement

सुरक्षेच्या कारणास्तव जवानांसाठी नवीन डिझाइन केलेले कापड खुल्या बाजारात उपलब्ध नसेल. एकदा कंपन्यांनी निविदेला प्रतिसाद दिला, की या कंपन्या या नवीन बॅटल ड्रेस युनिफॉर्म्स (BDU)चा पुरवठा करतील. हे गणवेश भारतीय सैन्यातील विविध युनिट्स आणि फॉर्मेशन्सना पाठवले जातील नि तेथे ते खरेदी करता येणार आहेत.

भारतातील विविध ठिकाणचे हवामान, भूप्रदेश लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालय सैन्याचा गणवेश तयार करणार आहे. अति उष्ण ते शून्य तापमानात, सैनिकांसाठी आरामदायी, तसेच अधिक मजबूत नि हलके कापड असू शकते. गणवेशाचा रंग मात्र आधीचाच असण्याची शक्यता आहे.

Advertisement

गणवेशाचा इतिहास..
भारतीय सैन्याचा गणवेश आतापर्यंत तीन वेळा बदलण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारत नि पाकिस्तानी सैन्याचा गणवेश वेगवेगळा असावा, यासाठी बदल केले होते. नंतर 1980 मध्ये गणवेशात आणखी एक बदल केला. त्याला ‘बॅटल ड्रेस’ असे नाव दिले. 2005 मध्ये तत्कालिन केंद्र सरकारने ‘सीआरपीएफ’ (CRPF) आणि ‘बीएसएफ’ (BSF)च्या युनिफॉर्मसाठी ‘आर्मी डीपी बॅटल ड्रेस’ वेगळे करण्यासाठी गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला होता.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement

 

Advertisement