SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘टाटा’च्या ‘सीएनजी’ कारचे लवकरच लाॅंचिंग, फक्त 5 हजारांत बुकिंग करता येणार..!

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे चारचाकी सांभाळणेही मुश्किल झाले आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे ग्राहक ईलेक्ट्रिक किंवा गॅसवरील वाहनांना प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

ग्राहकांचा कल लक्षात घेऊन, अ‍ॅटो माेबाईल क्षेत्रातील एक मोठे नाव असणाऱ्या टाटा मोटर्स (Tata motors) कंपनी लवकरच ‘सीएनजी’ (CNG) प्रकारातील दोन कार भारतीय बाजारपेठेत लॉंच करणार आहे. कंपनीने टाटा टियागो (Tata Tiago) व टाटा टिगोर (Tata Tigor) हे दोन माॅडेल ‘सीएनजी’ स्वरुपात बाजारात आणले जाणार आहेत..

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Spreadit (@spreadit_india)

Advertisement

सध्या मारुती सुझुकी (Maruti suzuki) व ह्युंदाई (Hundai) या दोन कंपन्यांच्याच कार ‘सीएनजी’ प्रकारात आलेल्या आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरु असताना, आता ‘टाटा’ही त्यात उतरणार असल्याने ग्राहकांचा फायदा होऊ शकतो.

सध्या ‘टाटा’च्या ‘सीएनजी’मध्ये येणाऱ्या दोन्ही कारसाठी बुकिंग सुरू झाले असून, अगदी 5 हजार ते 20 हजार रुपयांमध्ये ग्राहकांना या कार बूक करता येणार आहेत. दोन्ही कारचे अधिकृत लॉंचिंग 19 जानेवारी 2022 रोजी होणार असल्याचे टाटा कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement

‘टाटा टियागो’ व ‘टिगोर’ कार आता ‘सीएनजी’ प्रकारात येणार असल्या, तरी या दोन्ही कारच्या डिझाइनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. नवीन ‘सीएनजी बॅजिंग’ फक्त त्याच्या टेलगेटवर दिसेल. कंपनीने या दोन्ही कारचे ‘स्पेसिफिकेशन’ जाहीर केलेले नाही. सध्याच्या व्हेरियंटच्या ‘एंट्री-लेव्हल’ आणि ‘मिड-लेव्हल’ व्हेरियंटवर ‘सीएनजी किट’ दिले जाऊ शकते.

काय फरक असणार..?
सध्या टियागो व टिगोरमध्ये 1.2 लिटर, ३ सिलेंडर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन वापरले जाते. त्यातून 85bhp व 113Nm टॉर्क निर्माण होतो. इंजिनचा हाच सेटअप ‘सीएनजी’ प्रकारातही राहू शकतो. फक्त ‘पॉवर’ आणि ‘टॉर्क’मध्ये थोडा फरक असू शकतो.

Advertisement

‘सीएनजी’ प्रकारात 1.2 लिटर इंजिन जवळपास 70-75bhp पॉवर आणि 100Nm टॉर्क निर्माण करु शकते. पेट्रोल कारमध्ये मॅन्युअल आणि ‘एएमटी’ गिअरबॉक्स असतात. ‘सीएनजी’ प्रकारात फक्त 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्ससह दिले जातील.

कोणाशी स्पर्धा होणार..?
टाटा टियागो सीएनजी कारची स्पर्धा ह्युंदाई सँट्रो सीएनजी आणि मारुती वॅगन-आर सीएनजीशी होईल, तर टिगोर सीएनजी कार ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura) सीएनजी कारला टक्कर देणार आहे. पेट्रोल, सीएनजी नि इलेक्ट्रिक, अशा तिन्ही प्रकारात सादर होणारी ‘टाटा टिगोर’ ही एकमेव सेडान कार असणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement