SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मतदार कार्ड हरवलंय? मग ‘या’ 11 कागदपत्रांपैकी एक असलं तरी करता येणार मतदान, वाचा कोणते..

देशातील अठरा (18) वर्षांच्या पुढील व्यक्ती मतदान करू शकतात, हे आपल्याला माहीतच असेल. आपल्या गावात, शहरात ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, विधानसभा आणि इतर निवडणुका होतात. त्यावेळी मतदार कार्डची (Voter-ID) भूमिका महतत्वाची असते. पण जर हे मतदार कार्ड हरवले तर काय होईल असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो.

जर तुमचं मतदार कार्ड हरवलं असेल, तर तुम्हाला तरीही मतदान करता येणार आहे, कारण यावर पर्यायी मार्ग म्हणून अनेक ओळ्खपत्रांना मतदानासाठी सरकारने संमती दिली आहे. तुमचे मतदार कार्ड हरवले तरी तुम्ही मतदार कार्डाशिवाय काही कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वापरू शकता, फक्त मतदार यादीत (Voter list) तुमचं नाव हवं आणि तुमच्याकडे मतदार कार्ड नसेल, तर खालीलपैकी कोणतंही एक कागदपत्र दाखवून तुम्ही मतदान करू शकता.

Advertisement

निवडणूक आयोग इतर 11 प्रकारच्या कागदपत्रांना ओळखपत्र म्हणून देते मान्यता:

▪️ आधार कार्ड (Aadhaar card)
▪️ पॅन कार्ड (Pan card)
▪️ ड्रायव्हिंग लायसेंस (Driving license)
▪️ MGNREGA जॉब कार्ड
▪️ पासपोर्ट (Passport)
▪️ पेंशन कार्ड (Pension card) ज्यावर तुमचा फोटो लागलेला असेल आणि अटेस्टेड असेल
▪️ पोस्ट ऑफिस (Post office) आणि बँकेद्वारे जारी केलेले पासबूक.
▪️ लेबर मिनिस्ट्री द्वारे जारी केलेले हेल्थ इंश्योरेंस कार्ड (insurance card)
▪️ नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर (NPR) द्वारे जारी स्मार्ट कार्ड
▪️ खासदार किंवा आमदाराकडून जारी अधिकृत ओळखपत्र
▪️ तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी असाल किंवा PSUs आणि Public Limited कंपनीमध्ये काम करत असाल तर कंपनीच्या फोटो आयडीच्या आधारेही मतदान करता येते.

Advertisement

मतदार यादीत ऑनलाईन नाव तपासण्यासाठी..

▪️ निवडणूक आयोगाची वेबसाईट Electoralsearch.in वर लॉग इन करा. तिथे तुमचं नाव टाका.
▪️ मग खालील पर्यायावर तुमचं वय/ जन्मतारीख अशी माहिती भरा.
▪️ त्याखालील पर्यायात तुम्ही पुरुष/स्त्री असाल तर तसा पर्याय निवडा किंवा इतर पर्याय निवडा.
▪️ मग शेवटी तुमचं राज्य, जिल्हा, विधानसभा निर्वाचित क्षेत्र/तालुका निवडा आणि तेथील एक समोर दिसणारा कोड (कॅप्चा कोड) भरून सर्च बटनावर क्लिक करा.
▪️ मग तूमच्यासमोर एक लिस्ट येईल. तिथे अनेक नाव व मतदार क्रमांक तिथे तुम्ही तुमचे सर्व डिटेल्स तपासू शकता.
▪️ EPIC नंबरला मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणतात. या नंबरच्या माध्यमातून मतदार सूचीमध्ये आपले नाव तपासू शकता.
▪️ सर्व माहिती देऊनही जर माहिती समोर येत नाही तर निवडणूक आयोग टोल फ्री नंबर 1800111950 वर कॉल करु शकता.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement