SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गुगल-पे, फोन-पे, पेटीएमची सेवा ठप्प, डिजिटल पेमेंट होत नसल्याने ग्राहक वैतागले..

ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. देशात बहुतांश ठिकाणी गुगल-पे, फोन-पे, पेटीएम यांसारख्या माध्यमाद्वारे होणारे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले होते. गेल्या काही तासांपूर्वी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे डिजिटल पेमेंटची सुविधा बंद पडल्याचे पाहायला मिळाले.

ऑनलाईन व्यवहार पूर्ण होत नसल्याने, ग्राहकही वैतागले होते. याबाबत सोशल मीडियावर ग्राहकांनी आपला संताप व्यक्त केला. नेमकी अडचण समजत नसल्याने ग्राहक हैराण झाले होते. अनेक युजर्सनी ट्विटरवर राग व्यक्त केला. पेटीएम (Paytm) व गुगल पे (Google pay)द्वारे ऑनलाइन पेमेंट होत नसल्याचे काही युजर्सनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’नेही (NPCI) ‘यूपीआय’ सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली. तसेच ग्राहकांना झालेल्या त्रासाबद्दल माफीदेखील मागितली.

Advertisement

‘युपीआय सर्व्हर’मध्ये त्रूटी
तांत्रिक अडचणींमुळे ‘युपीआय सर्व्हर’मध्ये काही त्रूटी निर्माण झाल्या होत्या, पण आता सर्व्हर पूर्ववत करण्याचे काम सुरू झाले असून, आम्ही संपूर्ण सिस्टीमवर लक्ष ठेवून असल्याचे ‘एनपीसीआय’ने ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, ‘आयसीआयसीआय’ (ICICI Bank) बँकेनेही तांत्रिक दुरुस्तीमुळे ‘युपीआय सर्व्हर’ काही काळ डाऊन झाल्याचे म्हटलं आहे.

तात्काळ पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी, युटिलिटी बिल्स भरण्यासाठी प्रामुख्याने ‘यूपीआय’चा वापर केला जातो  हे व्यवहार करताना, ग्राहकांना यापूर्वीही अनेक वेळा समस्यांना सामोरे जावे लागते. त्याबाबत असंख्य तक्रारीही आल्या आहेत. प्रत्येक ‘यूपीआय’ मोबाइल अ‍ॅप्लिकेशनमध्ये व्यवहारांशी संबंधित तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया वेगवेगळी असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement