SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी..! सरकारच्या या योजनेस उद्यापासून प्रारंभ..

भारतीयांना पूर्वीपासूनच सोन्याचे वेड आहे.. विविध सण-मुहुर्तावर, लग्न सोहळ्यात भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. तसेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीलाच प्राधान्य दिले जाते.. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच असून, त्यात आताच गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो..

विशेष म्हणजे, सध्याच्या बाजारभावापेक्षाही कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध झालीय, तीही थेट रिझर्व्ह बॅंकेकडून..! ‘सोव्हेरन गोल्ड बॉंड’ची पुढील सिरिज उद्यापासून (ता. 10 जानेवारी) गुंतवणुकीसाठी खुली होत आहे. रिझर्व्ह बॅंकेने त्यासाठी 4786 रुपये प्रति ग्रॅम असा सोन्याचा भाव निश्चित केला आहे.

Advertisement

‘सोव्हेरन गोल्ड बॉंड’ची ही 11 वी सिरीज असून, 10 ते 14 जानेवारी 2022 दरम्यान त्यात गुंतवणूक करता येणार आहे. बाजारातील किंमतीपेक्षा कमी दराने सोने खरेदीची गुंतवणुकदारांना मोठी संधी आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी डिजिटली पेमेंट केल्यास गुंतवणुकदारांना प्रति ग्रॅममागे 50 रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे.

‘सॉवरेन गोल्ड बॉंड’मध्ये ‘इश्यू प्राईस’वर दरवर्षी 2.50 टक्के निश्चित व्याज मिळते. व्याजाचे पैसे प्रत्येक 6 महिन्यांनी तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतात. बॉंडची विक्री व्यक्तिगतरित्या, भारताचे रहिवासी, हिंदू अविभाजित परिवार, ट्रस्ट्स, विद्यापीठ आणि संस्थांना दानही करता येते..

Advertisement

सोव्हेरन गोल्ड बॉंड म्हणजे..
‘सोव्हेरन गोल्ड बॉंड’ (Sovereign Gold Bond) हे रिझर्व्ह बॅंक किंवा अर्थमंत्रालयाकडून बाजारात आणले जातात. त्यात किमान 1 ग्रॅम ते जास्तीत जास्त 4 किलो सोन्यासाठी गुंतवणूक करता येते. यात हातात प्रत्यक्ष सोने मिळत नाही, तर ही प्रमाणपत्राच्या स्वरुपात 8 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक असते.

सध्या गुंतवणूक केल्यावर 8 वर्षांनंतर त्यावेळी असलेल्या सोन्याच्या भावाप्रमाणे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य मिळते. सोन्यातील ही गुंतवणूक सरकारी बॉंडमध्ये असल्याने ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. शिवाय त्यावर परतावाही चांगला मिळतो.

Advertisement

कोण गुंतवणूक करु शकते..?
‘सोव्हेरन गोल्ड बॉंड’मध्ये भारतीय नागरिक, मोठे गुंतवणुकदार, ट्रस्ट, विद्यापीठे आणि स्वयंसेवी संस्था गुंतवणूक करू शकतात. त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. बॅंका, पोस्ट ऑफिस, स्टॉक एक्सचेंज, स्टॉक होल्डिंग्स कॉर्पोरेशन अशा विविध माध्यमातून ‘सोव्हेरन गोल्ड बॉंड’मध्ये गुंतवणूक करता येते.. ऑनलाइन व ऑफलाइन स्वरुपातही ही गुंतवणूक करता येते..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement