SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रणविर सिंग याच्यामुळे अंबानी कुटुंबाला कोट्यवधीचा फटका, रणविर सिंग याचेही झाले मोठे नुकसान..!

भारतातील सर्वात मोठे उद्योगपती नि श्रीमंत व्यक्ती म्हटलं की एकच नाव समोर येते, ते म्हणजे अंबानी कुटुंब..! रिलायन्स कंपनीची जगभरात एक खास ओळख आहे. ‘रिलायन्स’चे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची साऱ्या जगाला कल्पना आहे.

अंबानी कुटुंबातील मुकेश अंबानी हे बिझनेस जगतातील एक मोठे नाव. सोशल मीडियावर त्यांची सतत मोठ्या प्रमाणात चर्चा होते. तसेच अंबानी कुटुंबाबाबतही अनेकांना उत्सुकता असते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी याही सतत कोणत्या ना कोणत्या तरी कारणांनी चर्चेत असतात..

Advertisement

बॉलिवूडसोबतही अंबानी कुटुंबाचे खास कनेक्शन आहे. अंबानी कुटुंबातील मोठमोठे सोहळे असो की पार्ट्या बाॅलिवूडमधील सारे स्टार झाडून, न चुकता तेथे हजेरी लावताना दिसतात. रिलायन्स एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक सिनेमेही रिलीज झाले आहेत. अनेक टॉप कलाकारही रिलायन्ससोबत काम करण्यासाठी उत्सुक असतात.

या स्टारमुळे रिलायन्सला फटका
दरम्यान, बाॅलिवुडमधील एका स्टारमुळे अंबानी कुटुंबाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. हा स्टार दुसरा-तिसरा कोणी नसून, अभिनेता रणवीर सिंग आहे..!

Advertisement

भारतीय संघाने कपील देव यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटमधील पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावर ’83’ नावाचा चित्रपट नुकताच येऊन गेला. त्यात रणवीर सिंग याने कपील देव यांची भूमिका साकारली होती. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला..

रिलायन्स एंटरटेनमेंटने या बिग बजेट चित्रपटासाठी 125 कोटी रुपये गुंतवले होते. चित्रपट चांगला कल्ला मिळवेल, अशी सगळ्यांना आशा होती. मात्र, प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात हा चित्रपट अपयशी ठरला. त्यामुळे चित्रपटाला अपेक्षित व्यवसाय करता आला नाही..

Advertisement

आतापर्यंत फक्त 59 कोटींची कमाई
चित्रपटावर खर्च झालेली रक्कमही मिळाली नाही. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 59 कोटींची कमाई केलीय. त्यामुळे रणवीर सिंगने अंबानी कुटुंबाला करोडोंचा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. वास्तविक, 2021 मधील हा सर्वात मोठा ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपट असेल, अशी निर्मात्यांना आशा होती, पण सगळ्या आशा धुळीला मिळाल्या.

बॉक्स ऑफिसवर चित्रपट न चालल्याने ‘रिलायन्स’चे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, मुख्य अभिनेता रणवीर सिंग यालाही या त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंग याने 200 कोटी रुपये फी घेतली होती. शिवाय चित्रपट रिलिज झाल्यानंतर मिळणाऱ्या नफ्यातही त्याला वाटा हवा होता.

Advertisement

थिएटरमध्ये हा बिग बजेट सिनेमा कोसळल्याने आता रणवीर सिंगच्या फिसमध्येही कपात केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. साहजिकच, ’83’ सिनेमाने ‘रिलायन्स’ बरोबरच रणवीर सिंग यालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement