SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अमिताभ बच्चन यांनी मागितली सचिन तेंडुलकरची माफी, नेमकं काय घडलं, वाचा..!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नि बाॅलिवुडचा महानायक अमिताभ बच्चन.. क्रिकेट व चित्रपटसृष्टीतील दिग्गज नावे.. भारतात या दोघांचेही कोट्यवधी फॅन आहेत. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर आहे. मात्र, नुकतीच अमिताभ बच्चन यांच्याकडून सचिनबाबत एक चूक झाली.. नि त्याची जाणीव होताच मोठ्या मनाने त्यांनी लगेच माफीही मागितली..

नेमका हा काय प्रकार होता..? कशामुळे अमिताभ बच्चन यांच्यावर सचिनची माफी मागण्याची वेळ आली, असे काय झाले होते, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं काय घडलं..?
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्याबाबत अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक चुकीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. मात्र, आपली चूकी लक्षात आल्यावर बच्चन (Amitabh Bachchan) यांनी माफी मागतली व नंतर सुधारित व्हिडीओही शेअर केला.

येत्या 20 जानेवारीपासून मस्कट येथे लिजंडस लिग क्रिकेट (LLC) सुरु होणार आहे. त्यात भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांसह विविध देशांतील माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. भारतीय संघाकडून सचिन तेंडुलकरही या स्पर्धेत खेळणार असल्याचे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले होते..

Advertisement

लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) स्पर्धेचा सचिन भाग नाही, तो या स्पर्धेत खेळणार नसल्याचे सचिन तेंडुलकरची मॅनेजमेंट कंपनी ‘एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच आयोजकांनी फॅन्स व अमिताभ बच्चन यांची दिशाभूल करणे टाळावे, असे आवाहनही ‘एसआरटी स्पोर्ट्स’कडून करण्यात आले.

Advertisement

बच्चन यांचा माफीनामा
अमिताभ बच्चन यांनाही आपल्या चुकीची जाणीव झाली व त्यांनी ट्विट केलेला व्हिडीओ तातडीने डिलिट करीत माफी मागितली. तसेच नव्याने ‘लिजेंड्स लीग क्रिकेट-20’चा सुधारित व्हिडीओ शेअर केला. “कुणालाही त्रास झाला असेल, तर माफी मागतो. ही अनावधानाने झालेली चूक होती..,’ असे ट्विट त्यांनी केले.

दरम्यान, ‘लिजेंड्स लीग क्रिकेट’मध्ये विरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, मोहम्मद कैफ, जॉन्टी ऱ्होडस, केव्हिन पीटरसन, वासिम अक्रम, शोएब अख्तर यांसारखे दिग्गज माजी खेळाडू सहभागी होणार आहेत. इंडिया महाराजा, एशिया लॉयन्स आणि वर्ल्ड जायंट्स अशा टीममध्ये या खेळाडूंची विभागणी होणार असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement