SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयफोन (iPhone) घेण्याचं तुमचं स्वप्न होणार पूर्ण, ‘या’ मॉडेलवर भेटतोय ‘इतका’ डिस्काउंट…

जगात अनेक कंपन्यांनी आपले एक ना एक स्मार्टफोन बाजारपेठेत लॉन्च करून चांगला गल्ला जमवला. आपण जास्त करून अँड्रॉईड स्मार्टफोन्सना पसंती देतो, ते स्वस्त आणि आपल्याला वापरण्याजोगे म्हणायचं झालं तर सोपे असतात. जर तुम्ही ते स्मार्टफोन्स वापरून कंटाळले असाल, तर यंदा काहीतरी भारी करण्याच्या मूडमध्ये असाल, तर फ्लिपकार्ट (Flipkart Big Saving days) वर नुकतीचं बिग सेव्हिंग सेलला सुरुवात झाली आहे.

आयफोनवर मिळतेय भरघोस सूट..

Advertisement

फ्लिपकार्ट आयोजित या ऑफर्सनुसार, येथे अनेक प्रॉडक्टवर आकर्षक ऑफर दिल्या आहेत. हा सेल 7 जानेवारीला सुरु झाला असून 9 जानेवारीपर्यंत राहणार आहे. जर तुम्हाला या सेलमध्ये आयफोन खरेदी करण्याची इच्छा असेल, तर यापेक्षा दूसरी चांगली संधी सध्यातरी मिळू शकत नाही.

फ्लिपकार्टवरच्या या सेलमध्ये APPLE iPhone 12 mini या फोनवर जबरदस्त ऑफर दिली आहे. APPLE iPhone 12 mini ची लॉन्चवेळी 59,900 रुपये प्राईज आहे. परंतु फ्लिपकार्टवरील महाबचत सेलमध्ये या फोनवर तब्बल 31 टक्क्यांची सूट दिली जात आहे. हा फोन आता या ऑफरमुळे तुम्हाला 40,999 रुपयांना मिळणार आहे.

Advertisement

आयफोन खरेदी करताना अनेक बँकेच्या कार्डवर डिस्काऊंट आणि एक्सेंज ऑफरही (जुना फोन देऊन नवीन फोन घेणे) फ्लिपकार्टने दिली आहे. या फोनवर ॲक्सिस बँक 5 टक्के सूट देत आहे. ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने (Axis bank credit card) पेमेंट केल्यास तुम्हाला 2050 रुपयांची सूट मिळेल. ही सूट मिळाल्यानंतर या आयफोनची किंमत फक्त 38,949 रुपये होईल. त्यामुळे ग्राहकांची बरीचशी बचत आणि फायदाही होणार आहे.

iPhone mini 12 खरेदी करण्यासाठी किंवा फीचर्स माहीत करून घेण्यासाठी क्लिक करा 👉 https://dl.flipkart.com/s/Egi1OaNNNN

Advertisement

फ्लिपकार्टने या फोनवर एक्सेंज ऑफरही दिली आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्स्चेंज केला तर तुम्हाला 15,450 रुपयांची सूट मिळेल. पण त्यासाठी तुम्ही एक्स्चेंज करणारा फोन चांगल्या स्थितीत असायला हवा. त्याचे प्रत्येक पार्ट्स काम करणारे हवेत. महत्वाचे म्हणजे कॅमेरा, हेडफोन जॅक, स्पीकर, डिस्प्ले हे चांगले असायला हवेत. तरचं तुम्हाला हा सूट मिळू शकणार आहे. या ऑफरसहीत फोनची किमंत 23,499 रुपये होऊन तुमचा फायदा होऊ शकतो. यामध्ये तुमचा जुना स्मार्टफोन कसा आहे त्यानुसार ती किंमत ठरविली जाते. हे लक्षात ठेवावे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement