SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘त्या’ विचित्र घटनेनंतर सचिनने सूचवला नवा नियम, शेन वाॅर्नचाही सचिनला पाठिंबा…!

क्रिकेटच्या मैदानातही कधी कधी आश्चर्यजनक प्रकार पाहायला मिळतात.. कधी दोन्ही संघांतील खेळाडूंमधील वादामुळे वातावरण गरम होते, तर कधी मजेशीर घटनांनी चेहऱ्यावर हसू फुटते.. बॅट-बाॅलमधील हा संघर्ष कधी काय खेळ दाखवेल, सांगता येत नाही..

असाच एक प्रकार नुकताच समोर आला.. सध्या ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामन्यांची प्रतिष्ठीत अ‍ॅशेस मालिका सुरु आहे. ऑस्ट्रेलिया संघाने पहिले तिन्ही सामने जिंकून आधीच मालिका खिशात घातलेली आहे. उर्वरित दोन सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचा इंग्लंडचा प्रयत्न आहे..

Advertisement

सिडनी येथे सुरु असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला.. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपाहारानंतर (दुसऱ्या सत्रात) डावाच्या 30 व्या षटकातील पहिलाच चेंडू बेन स्टोक्सने सोडून दिला. चेंडू पॅडला लागल्याचे वाटल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले. अंपायर पॉल रायफल यांनीही बोट वर करीत स्टोक्सला आउट दिले.

Advertisement

पंचाच्या निर्णयाविरोधात स्टोक्सने ‘डीआरएस’ घेतला असता, रिप्ले पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. कारण, चेंडू बॅट किंवा पॅडला नव्हे, तर स्टंम्पला लागला होता. मात्र, तरीही बेल्स खाली पडल्या नाहीत, त्यामुळे स्टोक्सला नाबाद देण्यात आले.

सचिनचे म्हणणे काय..?
सिडनी कसोटीतील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर बाॅलरसाठी मैदानात उतरलाय. “बॉल स्टम्पला लागल्यानंतरही बेल्स पडल्या नाहीत, त्यामुळे ‘हिटिंग द स्टंप्स’ असा नियम करायला हवा. बाॅलरबाबत आपण निष्पक्ष असायला हवे..” असे सचिनने म्हटले आहे..

Advertisement

शेन वार्नचाही पाठिंबा
सचिनच्या या भूमिकेला ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने पाठिंबा दिला आहे. “ही गोष्ट खूपच रंजक आहे नि मित्रा, त्यावर वादही होऊ शकतो. मी हा प्रकार जागतिक क्रिकेट समितीपुढे मांडणार आहे. नंतर तुला सांगेन. असा प्रकार पूर्वी कधीही पाहिला नाही..” असे वाॅर्नने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे..

Advertisement

“ही खूप विचित्र गोष्ट असून, अशी घटना मी पहिल्यांदाच पाहिली.. या घटनेत चेंडू स्टम्पला लागला, मात्र बेल्स पडल्या नाहीत. मला माफ करा, मी अजूनही शॉकमध्ये आहे. मला अजूनही खात्री नाही, की आम्ही नेमकं काय पाहिलंय… असे वाॅर्न याने म्हटलं आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement