SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, घरबसल्या ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी वाचा..

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी आणि आठवीच्या ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी अखेर शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीचे 57 हजार 334, तर आठवीचे 23 हजार 962 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यातील इयत्ता पाचवीचे 14 हजार 250 आणि आठवीचे 10 हजार 736 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असणार आहेत.

सविस्तर माहीती वाचा…

Advertisement

परीक्षेचे नाव : नोंदणी केलेले विद्यार्थी : उपस्थित विद्यार्थी : अनुपस्थित विद्यार्थी : पात्र विद्यार्थी : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी : पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार टक्केवारी)

▪️ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा – इयत्ता पाचवी : 3,88,515 : 3,37,370 : 37,871 : 57,334 : 14,250 : 16.99 टक्के

Advertisement

▪️ पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा- इयत्ता आठवी : 2,44,314 : 2,10,338 : 22,814 : 23,962 : 10,736 : 11.39 टक्के

▪️ एकूण : 6,32,829 : 6,31,014 : 60,685 : 81,296: 24,986: 14.20 टक्के

Advertisement

शिष्यवृती परीक्षेचा (pre upper primary & pre secondary scholarship examination result) निकाल पाहण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर क्लिक करा, वरील उजव्या कोपऱ्यात अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी) यावर क्लिक करा आणि पुढील विंडोमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक बैठक क्रमांक टाकून निकाल पाहा

▪️👉 www.mscepune.in

Advertisement

▪️👉 https://www.mscepuppss.in/

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 12 ऑगस्ट 2021 रोजी ही शिष्यवृत्ती परीक्षा मुंबई वगळता संपूर्ण राज्यात घेण्यात आली. परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल 24 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला, तर 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या वेळेत गुणपडताळणीसाठी अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन पद्धतीने मागविले होते.

Advertisement

परिषदेने दिलेल्या मुदतीमध्ये ऑनलाईन आलेल्या परिपूर्ण अर्जांवरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी केली. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार केला आहे. या निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केलीय. शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम गुणपत्रकाची प्रत परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र लवकरच शाळांना पोचविण्यात येणार आहेत.

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी :

Advertisement

इयत्ता पाचवी :

▪️ शहरी विभाग : स्वराज चव्हाण (सी. एस. हायस्कूल वडूज, सातारा)
▪️ ग्रामीण विभाग : तनिष्का गायकवाड (जिल्हा परिषद शाळा, तळेगाव, पुणे)
▪️ सीबीएसई/आयसीएसई शाळांचे विद्यार्थी : निरंजन तोरडमल (पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा)

Advertisement

इयत्ता आठवी :

▪️ शहरी विभाग : श्रावणी धस (वसुंधरा प्राथमिक विद्यालय, आष्टी, बीड)
▪️ ग्रामीण विभाग : उमर शेख (नूतन एमव्ही युएमव्ही, मिरजगाव, नगर)
▪️ सीबीएसई/आयसीएसई शाळांचे विद्यार्थी : प्राजक्ता चव्हाण (विद्यानिकेतन ॲकॅडमी, नगर)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement