SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लागू..! ठाकरे सरकारकडून कडक निर्बंध जाहीर..

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, ओमायक्राॅनचेही संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरे होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे आज (ता. 8) काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेऊन, ठाकरे सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. सरकारच्या आदेशानुसार येत्या 10 जानेवारीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत. त्यात लग्न समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांतील लोकांच्या उपस्थितीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

Advertisement

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात अखेर ‘नाईट कर्फ्यू’चा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत राज्यात ‘नाईट कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला असून, उद्या (ता. 9) मध्यरात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

काय सुरु-काय बंद..?
– राज्यातील शाळा-कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहतील. दहावी-बारावीच्या कोचिंग क्लासेससाठी सूट दिली आहे. इतर सर्व कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील. हे क्लासेस ऑनलाईन सुरु असतील.
– सरकारी कार्यालयांसाठी 50 टक्के उपस्थितीची अट असेल.

Advertisement

– राज्यात दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी असेल, अत्यावश्यक सेवांसाठी मुभा दिली आहे.
– मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे पूर्णत: बंद करण्यात आली आहेत.
– सलून 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

– राज्यातील थिएटर 50 टक्के प्रेक्षक क्षमतेने सुरु राहतील.
– हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील
– स्विमिंग पूल, स्पा, जिम पूर्णत: बंद राहतील.

Advertisement

– विवाह सोहळा हा बंदिस्त जागेत असो वा मैदानात, जास्तीत जास्त 50 लोकांनाच हजर राहता येईल.
– सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम असो वा मेळावा.. जास्तीत जास्त 50 लोकच उपस्थित राहू शकतात.
– अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची संख्या 20 लोकांपुरती मर्यादित असेल.

– मुंबई लोकलवर कोणतेही निर्बंध नाहीत.
– लसीचे दोन डोस घेतलेले ग्राहक व पर्यटकांनाच शॉपिंग मॉलमध्ये परवानगी मिळेल. त्यासाठी ग्राहकांना थर्मल टेस्टिंग करावं लागेल.

Advertisement

– राज्यात दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली असून, दिवसा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
– रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
– परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 72 तास आधीचा ‘आरटीपीसीआर’ रिपोर्ट सादर करावा लागणार.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement