SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! महाराष्ट्रात सोने स्वस्त होणार? जाणून घ्या काय आहे कारण..

सध्या कोरोनामुळे दररोज शेअर मार्केटमध्ये आधीपेक्षा जास्त चढ-उतार बघायला मिळतो. सोन्याच्या भाव कमी होण्यामागे किंवा वाढण्यामागे आंतराष्ट्रीय बाबी देखील समाविष्ट असतात, ज्याचा परिणाम सोन्याच्या भावावर, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर होत असतो. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ग्राहकांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आपली कर प्रणाली सुधारण्याच्या उद्देशाने आणि महसूल वाढीसाठी महाराष्ट्र सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
महाराष्ट्र सरकार राज्यातील सोने आणि चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क कमी किंवा माफ करण्याचा सध्या तयारीत आहे.

Advertisement

राज्यात हवाईमार्गे आयात केलेल्या सोन्यावर महाराष्ट्र सरकार 0.1 टक्के मुद्रांक शुल्क आकारते. तर, इतर राज्यांमध्ये हे शुल्क माफ असल्याने किंवा नसल्याने इतर राज्यांमध्ये सोन्याची आयात होत आहे. याचा परिणाम राज्यातील सोने आयातीच्या प्रमाणात घट होण्यात दिसला.

दिल्लीतून महाराष्ट्रात व इतर राज्यांत सोने आयात करताना आकारल्या जाणाऱ्या जीएसटी करामुळे (GST on Gold) आधीच राज्य सरकारच्या महसूलावर परिणाम होत असतो. सोने महाराष्ट्रात आणताना त्याचा वाहतूक खर्चही ग्राहकांच्या माथी मारला जातो. जर सोन्यावरील मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यास राज्याच्या महसुलावर काय परिणाम होईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement

समजा सोन्यावरील मुद्रांक शुल्क माफ करायचं ठरल्यास त्याचा राज्याच्या महसुलावर व उद्योगांवर होणारा परिणाम आणि रोड मॅपची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारकडून सराफा आणि ज्वेलर्स उद्योगाच्या मागणीनंतर एक समिती स्थापन करण्यात आली असून एका महिन्यात ही समिती त्यासंबंधी अहवाल सादर करणार असल्याची माहीती आहे.

राज्य सरकारने हा निर्णय घेतला तर सोन्याच्या आयातीत दुपटीने म्हणजे दोन हजार टन इतकी वाढ होण्याचा अंदाज असल्याचे व्यावसायिकांचा अंदाज आहे. मोठ्या प्रमाणात मुंबई मार्गाने महाराष्ट्रात सोने आयात वाढण्याची शक्यता आहे, जर सोने आयात वाढली तर GST मध्ये वाढ होऊन या महसुलाने राज्याच्या महसुलात भर पडेल आणि महाराष्ट्राची आर्थिक घडी सुधारण्यास मदत होईल. यामुळे व्यापाऱ्यांना ही खर्च कमी लागणार आणि सोन्याच्या दरात किमान पाचशे रुपये प्रति तोळा दर कमी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/puUrE

Advertisement